बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा

By Admin | Published: February 12, 2016 01:25 AM2016-02-12T01:25:34+5:302016-02-12T01:25:34+5:30

मुंबई शहरात आणि लगतच्या पनवेल, वसई, विरार, भाईंदर परिसरात असलेल्या काही वेष्टनबंद पाणी उत्पादक विना परवाना बाटलीबंद पाणी विकत असल्याची तक्रार भारतीय बाटलीबंद

Bottled water bell | बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा

बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा

googlenewsNext

मुंबई : मुंबई शहरात आणि लगतच्या पनवेल, वसई, विरार, भाईंदर परिसरात असलेल्या काही वेष्टनबंद पाणी उत्पादक विना परवाना बाटलीबंद पाणी विकत असल्याची तक्रार भारतीय बाटलीबंद पाणी उत्पादक महासंघाने (आयबीडब्ल्यूएमए) अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) केली आहे.
मुंबईतील एफडीएच्या कार्यालयात अलीकडेच एफडीएचे संयुक्त दक्षता आयुक्त हरीश बैजल आणि सहाय्यक आयुक्त अभिमन्यू केरूरे यांची महासंघाने भेट घेतली. बनावट परवाने आणि आयएसआय व एफएसएसएआय यांचे बनावट शिक्के यांची सर्व कागदोपत्री पुरावे महासंघाने संबंधित अधिकाऱ्यांना सादर केले.
मुंबई आणि लगतच्या परिसरात बनावट ब्रॅण्ड व कंपन्यांची नावे त्यांना निवेदनाद्वारे देण्यात आली असून त्यात डी. एम. इंटरनॅशनलचा परवाना वापरून सबलाइम बीव्हरेजेस नावाने ‘लेवो’ आणि ‘फ्युलेरो’ ब्रॅण्डच्या उत्पादनांची निर्मिती करणारी डी. एम. इंटरनॅशनल मॅन्युफॅक्चर, गौदेवी वॉटर सोल्युशन, जैनम इंडस्ट्री, भुवल मिनरल वॉटर, फिनिक्स ड्यू, मझा अ‍ॅक्वा, आर्वा वॉटर्स, चिलर लाईफ केअर चिल्ड वॉटर, कोहिनूर बीव्हरेजेस (कोहिनूर अ‍ॅक्वा, तानी फ्रेश,
श्री नीर यासारखे ब्रॅण्ड) वेष्टनबंद पाणी विकत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, येत्या सात आठ दिवसांत आम्ही अभ्यास आणि तपासणी करू, असे दक्षता आयुक्त हरीश बैजल म्हणाले. काही बाटलीबंद पाण्याचे उत्पादक उत्पादनांवर आयएसआय व एफएसएसएआय यांचे बनावट शिक्के वापरून आणि कायदेशीर परवाना नसतानाही पाण्याची विक्री करीत आहेत. तसेच या उत्पादकांकडे योग्य ती यंत्रसामग्री नसून पाण्याची तपासणी करण्याची सुविधा त्यांच्याकडे नाही, असे -आयबीडब्ल्यूएमएचे सरचिटणीस अपूर्व दोशी म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Bottled water bell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.