CoronaVirus News : कार विकून रुग्णांसाठी खरेदी केले ऑक्सिजन सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 01:15 AM2020-06-23T01:15:42+5:302020-06-23T01:15:45+5:30

CoronaVirus News : सामाजिक संस्था चालवणाऱ्या दोन तरुणांनी स्वत:ची महागडी कार विकून त्या पैशात ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले.

Bought oxygen cylinders for patients by selling cars | CoronaVirus News : कार विकून रुग्णांसाठी खरेदी केले ऑक्सिजन सिलिंडर

CoronaVirus News : कार विकून रुग्णांसाठी खरेदी केले ऑक्सिजन सिलिंडर

Next

मुंबई : वेळेत उपचार मिळणे किती गरजेचे आहे हे आमच्या गरोदर बहिणीच्या मृत्यूमुळे समजले. त्यामुळे सामाजिक संस्था चालवणाऱ्या दोन तरुणांनी स्वत:ची महागडी कार विकून त्या पैशात ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले. त्याचा वापर आता कोरोनामुळे होम क्वारंटाइन लोकांसाठी केला जात आहे.
शहनवाज शेख आणि अब्बास रिझवी अशी या मालाडच्या दोन तरुणांची नावे असून ते एक एनजीओ चालक आहेत. काही दिवसांपूर्वी अब्बास याच्या चुलत बहिणीला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. ती सहा महिन्यांची गरोदर असल्याने या जगात येण्यापूर्वीच तिच्या बाळाने डोळे मिटले. त्या प्रकारामुळे या दोघांना जबर धक्का बसला आणि त्यांनी कोरोना संक्रमित असूनही गरिबीमुळे रुग्णालयात उपचार घेऊ न शकणाऱ्यांसाठी काही तरी करण्याचे ठरविले. मात्र त्यातही आर्थिक समस्या असल्याने अखेर शेखने स्वत:ची एसयूव्ही कार अवघ्या चार लाखांना विकली आणि त्यातून आलेल्या पैशांतून त्यांनी ६० लहान-मोठे आॅक्सिजन सिलिंडर विकत घेतले.

Web Title: Bought oxygen cylinders for patients by selling cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.