प्रेम संबंधात अडथळा ठरतो, म्हणून दीड वर्षाच्या बाळाची हत्या! सावत्र बापासह जन्मदात्या आईलाही अटक

By गौरी टेंबकर | Published: May 25, 2024 11:48 AM2024-05-25T11:48:24+5:302024-05-25T11:49:14+5:30

अपहरण,अपघाती मृत्यूचा केलेला बनाव 

boy becomes an obstacle in the relationship, hence the killing of a one and a half year old baby! mother along with stepfather arrested crime news | प्रेम संबंधात अडथळा ठरतो, म्हणून दीड वर्षाच्या बाळाची हत्या! सावत्र बापासह जन्मदात्या आईलाही अटक

प्रेम संबंधात अडथळा ठरतो, म्हणून दीड वर्षाच्या बाळाची हत्या! सावत्र बापासह जन्मदात्या आईलाही अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रेम संबंधात अडथळा ठरतो म्हणुन अवघ्या दिड वर्षाच्या बाळाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी सावत्र बाप राज राणा (२८) आणि बाळाची जन्मदाती आई रिंकी (२३) याना अटक केली. मुलाला ठार मारल्यानंतर त्याचे अपहरण झाल्याचे तसेच त्याचा मृत्यू अपघाती असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न या आरोपींनी केला. मात्र, शवविच्छेदन अहवालात घडला प्रकार उघड झाल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

राणाने २२ मे त्यांचा मुलगा अमन याला बेशुद्ध करून अनोळखी इसमांकडून रिक्षामधून त्याचे अपहरण झाल्याची तक्रार मेघवाडी पोलिसाना केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेज पडताळले. मात्र, त्यांना राणाच्या बोलण्यात तफावत आढळल्याने त्याची कसून चौकशी केली. तेव्हा २१ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता अमनला खेळण्यासाठी बाहेर नेताना तो जिन्यात पडला. त्यात डोक्याला मुका मार लागल्याने त्याचा जागीच जीव गेला. मी घाबरल्याने मुलाला घेऊन बाहेर गेलो. जेव्हीएलआर जंकशनकडून अंधेरीच्या दिशेने चालत पंप हाऊस पर्यंत आलो. तेथून पुन्हा गोरेगावच्या दिशेने जात रात्री उशिरा अमनचा मृतदेह गोरेगाव पूर्वच्या शिवधाम स्मशानभूमी समोरील नाल्यात त्याला टाकून दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, अमनच्या शवविच्छेदनामध्ये त्याच्या अंगावर ठिकठिकाणी मुका मार तसेच जखमा दिसून आल्या. डोक्यालाही मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
 

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न फसला
रिंकी आणि तिच्या पहिल्या पतीचा अमन हा मुलगा आहे. राणा आणि रिंकीच्या प्रेम संबंधांमध्ये तो अडथळा ठरत असल्याने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून दोघांनी त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह लपवून ठेवत त्याचे अपहरण झाल्याची खोटी फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.सदर गुन्हाचा तपास परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे आणि मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घाडगे, आंनद भगत उपनिरीक्षक वर्षा ठुले, हवालदार माने, शिपाई ठाकूर, शेख, वरठा या पथकाने केला.
 

Web Title: boy becomes an obstacle in the relationship, hence the killing of a one and a half year old baby! mother along with stepfather arrested crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.