पबजी खेळण्यास विरोध केल्याने मुलाने सोडले घर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:16 AM2019-04-02T03:16:58+5:302019-04-02T03:17:25+5:30

मयूर राजेंद्र गुळुंजकर (१७) असे कॉलेजकुमाराचे नाव असून, तो नेहमी मोबाइलवर पबजी गेम खेळत असल्याने त्याच्या काळजीपोटी आई त्याला रागावली.

The boy left the house because of opposition to playing PBJ | पबजी खेळण्यास विरोध केल्याने मुलाने सोडले घर

पबजी खेळण्यास विरोध केल्याने मुलाने सोडले घर

googlenewsNext

भिवंडी : शहरातील वºहाळादेवी रोडवरील मानसरोवर या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या कॉलेजकुमारास पबजी गेम खेळण्यास आईने विरोध केल्याने त्याने घर सोडल्याची घटना गुरुवारी घडली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रविवारी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर राजेंद्र गुळुंजकर (१७) असे कॉलेजकुमाराचे नाव असून, तो नेहमी मोबाइलवर पबजी गेम खेळत असल्याने त्याच्या काळजीपोटी आई त्याला रागावली. त्यामुळे तो दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर, त्याच्या आईने मयूरला परत आणण्यासाठी भिवंडी
रोड रेल्वेस्टेशनवर त्याच्या बहिणीस पाठवले. रेल्वेस्टेशनवर पोहोचल्यानंतर बहिणीने मोबाइलवर मयूरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रेल्वेस्टेशनजवळ उभ्या असलेल्या त्याच्या दुचाकीवर मोबाइल व दुचाकीची चावीही आढळून आली. त्याच्या बहिणीने मयूरला शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सापडला नाही. मुलगा सज्ञान नसल्याने त्याचे कुटुंबीय चिंताक्रांत झाले असून, त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात त्याच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 

Web Title: The boy left the house because of opposition to playing PBJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.