सायली कडू, मुंबईमराठी रंगभूमीच्या वाटचालीत महाराष्ट्र राज्य रंगभूमी आणि प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने (मराठी नाटकाचे सेन्सॉर बोर्ड) महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने रंगकर्मींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सेन्सॉर बोर्डाने ‘बीपी’ या नाटकाचे ‘ए’ प्रमाणपत्र रद्द करून किशोरवयीन मुलांसाठी खुले केले आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १२ नोव्हेंबरच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केले होते. या निर्णयामुळे रंगभूमीचे भवितव्य उज्ज्वल असल्याची भावना रंगकर्मींनी व्यक्त केली. याबाबत लेखक अंबर हडप म्हणाला कीे, बीपी हे नाटक पालक व पाल्यांच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. किशोरवयातील या मुलांना शरीरात होणारे बदल आणि लैंगिक आकर्षणाविषयी पडणाऱ्या प्रश्नांना लगेच दाबून टाकले जाते. या नाटकात अश्लील असे काहीच न दाखवता समाजप्रबोधन करण्यात येत आहे. आता मराठी नाटक सेन्सॉर बोर्डाने याचे ‘ए’ सर्टिफिकेट काढल्याने मूळ प्रेक्षकांपर्यंत हे नाटक पोहोचणार आहे.पाल्य आणि पालक यांच्या नात्यातील अंतर कमी होऊन सेक्सविषयीची घृणास्पद उत्सुकता कमी होण्यास प्रोत्साहन मिळेल. शासनाच्या या निर्णयाचे कौतुक आहे व यामुळे केवळ प्रौढांसाठीचा ठप्पा हटून रंगभूमीच्या सुवर्णकाळाकडे एक यशस्वी पाऊल टाकले आहे, असेही अंबरने सांगितले.
‘बीपी’ बालकांसाठीही!
By admin | Published: November 22, 2014 12:54 AM