मुंबई - आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीपीसीएल येथील हायड्रोक्रॅकर युनिटमधील बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागली. या स्फोटात एक जण गंभीर जखमी झाला असून एकूण ४३ कामगार जखमी झाले होते असल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत देसाई यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या ८ फायर इंजिन आणि ९ वॉटर टँकरच्या मदतीने आग पूर्णपणे विझविली असून या आगीत जखमी झालेल्या ४३ कामगारांपैकी २२ कामगारांना किरकोळ जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. तर २१ जखमी कामगारांवर चेंबूर येथील सुश्रुत रुग्णालयात उपचार सुरु आहे.
जखमींची नावे - :
१. भूषण पंडित
२. सरबजीत मंडल
३. सुशील भोसले
४. कृष्णमूर्ती
५. अवधूत परब
६. शेख मोहम्मद सूद
७. मनदीप वालवे
८. फिलिप कुरियन
९. नितीन म्हात्रे
१०. अस्लम शेख
११. परमानंद हावरे
१२. विनय शेगडे
१३. संजय साखरे
१४. सुशील शिवगणकर
१५. राहुल झाजुरराव
१६. सचिन सदाफुले
१७. शमीम खान
१८. अजय सुर्वे
१९. जयप्रकाश कदम
२०. रमेश कुमार