बीपीसीएलची आग विझवण्यात यश; ५ जखमी अतिदक्षता विभागात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 05:21 AM2018-08-10T05:21:41+5:302018-08-10T05:21:49+5:30

चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लान्टमध्ये बुधवारी दुपारी भीषण स्फोट होऊन लागलेली आग विझविण्यास बुधवारी मध्यरात्री २ वाजता मुंबई अग्निशमन दलाला यश आले.

BPCL's fires boosted; 5 injured in ICU section | बीपीसीएलची आग विझवण्यात यश; ५ जखमी अतिदक्षता विभागात

बीपीसीएलची आग विझवण्यात यश; ५ जखमी अतिदक्षता विभागात

Next

मुंबई : चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लान्टमध्ये बुधवारी दुपारी भीषण स्फोट होऊन लागलेली आग विझविण्यास बुधवारी मध्यरात्री २ वाजता मुंबई अग्निशमन दलाला यश आले. या आगीत ४५ जण जखमी झाले असून यातील ५ जणांवर अतिदक्षात विभागात उपचार सुरू आहेत.
बुधवारी दुपारी पावणे तीन वाजता लागलेली ही आग तब्बल ११ तासांनंतर मध्यरात्री २ वाजता विझविण्यात आली. आगीत ४५ जण जखमी झाले. यातील २२ जखमींवर बीपीसीएल हेल्थ केअर युनिटमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. सुश्रुत रुग्णालयात २२ जखमींवर उपचार सुरू होते. यातील ५ जणांना गुरुवारी सोडण्यात आले, १२ जखमींची प्रकृती स्थिर आहे. ५ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अन्य एकाला गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्यालाही घरी पाठविण्यात आले आहे.
बीपीसीएल प्रशासन आगीच्या कारणांचा शोध घेत आहे. आगीमुळे उत्पादनावर परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: BPCL's fires boosted; 5 injured in ICU section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.