बीपीसीएलची पाइपलाइन फुटली

By admin | Published: May 3, 2015 05:43 AM2015-05-03T05:43:14+5:302015-05-03T05:43:14+5:30

चेंबूरच्या गडकरी खाण परिसरात शनिवारी पहाटे बीपीसीएल कंपनीची कच्चे तेल वाहून नेणारी भूमिगत पाइपलाइन फुटून हजारो लीटर कच्चे तेल रस्त्यावर पसरले.

BPCL's pipeline bursts | बीपीसीएलची पाइपलाइन फुटली

बीपीसीएलची पाइपलाइन फुटली

Next

मुंबई : चेंबूरच्या गडकरी खाण परिसरात शनिवारी पहाटे बीपीसीएल कंपनीची कच्चे तेल वाहून नेणारी भूमिगत पाइपलाइन फुटून हजारो लीटर कच्चे तेल रस्त्यावर पसरले. स्थानिकांनी पोलीस, अग्निशमन दलाकरवी घटनेची वर्दी देऊनही कंपनीचे अभियंते, अधिकारी अनेक तासांनी घटनास्थळी दाखल झाले.
बीपीसीएल, एचपीसीएलचे तेलशुद्धीकरण प्रकल्प चेंबूरच्या माहुल, गडकरी खाण परिसरात आहेत. त्यापैकी बीपीसीएल कंपनीची २४ इंच व्यासाची कच्चे तेल वाहून नेणारी पाइपलाइन गडकरी खाण परिसरातील पेप्सी कंपनीजवळ फुटली.
सकाळी नऊच्या सुमारास कंपनीचे अभियंते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून डागडुजी सुरू केली. मात्र तोवर हजारो लीटर कच्चे तेल रस्त्यावर आले होते. या तेलाला रॉकेलचा वास होता. त्यामुळे परिसरात सर्वत्र हा वास पसरला. सुदैवाची बाब म्हणजे घटनास्थळापासून लोकवस्ती बऱ्याच अंतरावर असल्याने सांडलेल्या तेलाचा फटका कोणाला बसला नाही.

Web Title: BPCL's pipeline bursts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.