मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगारांना गणेशोत्सवामध्ये १८.२६ टक्के बोनस देण्याचे आदेश केंद्रीय नौकानयन मंत्रालयाचे संयुक्त सचिव के.के. अग्रवाल यांनी देशातील सर्व बंदरांच्या अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील बंदर कामगारांना ऐन गणेशोत्सवात १५ हजार ३३९ रुपयांचा बोनस मिळणार आहे.अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे अध्यक्ष अॅड. एस. के. शेट्ये आणि सरचिटणीस सुधाकर अपराज यांनी केंद्रीय नौकानयन मंत्रालय व इंडियन पोर्ट असोसिएशनचे चेअरमन संजय भाटिया यांच्याकडे बोनसची मागणी केली होती. त्यानुसार नौकानयन मंत्रालयाने देशातील सर्व बंदर अध्यक्षांना बोनस देण्याचे आदेश दिले. मुंबई बंदरातील कामगारांना बोनस वाटपासाठी १३ कोटी २४ लाख रुपये, तर देशातील सर्व बंदरांसाठी ४८ कोटी ३० लाख खर्च अपेक्षित आहे. या आदेशानुसार बोनस देण्यासाठी पगाराची मर्यादा ७ हजार रुपये असेल. गणपती उत्सवादरम्यान बोनसची रक्कम मिळेल.
बीपीटी कामगारांची गणपतीत दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 6:11 AM