मोबाइलच्या वापरामुळे मेंदूविकार? झोपेची समस्या अन् निद्रानाश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 01:50 PM2023-07-18T13:50:22+5:302023-07-18T13:50:46+5:30

तासन् तास मोबाइलवर घालविल्याने झोपेची समस्या, निद्रानाश

Brain disease due to the use of mobile? Sleep problems and insomnia | मोबाइलच्या वापरामुळे मेंदूविकार? झोपेची समस्या अन् निद्रानाश

मोबाइलच्या वापरामुळे मेंदूविकार? झोपेची समस्या अन् निद्रानाश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे मेंदूशी निगडित विकार होत असल्याचे आता हळूहळू सामोरे येत आहे. काही जणांना मोबाइलचे व्यसन जडले आहे. ही मंडळी दिवसातील तास न तास मोबाइलवर घालवत असल्यामुळे त्यांना झोपेच्या समस्या, निद्रनाश यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच या अतिरेकी वापरामुळे काम करण्याच्या एकाग्रतेवर याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. नागरिकांच्या  स्मरणशक्तीवरही परिणाम झालेला आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी जितकी गरज आहे तितकाच मोबाइल वापरावा, असे डॉक्टर अनेक वेळा सांगतात.

मोबाइलच्या अतिवापराचा परिणाम मेंदूवर विविध प्रकारे होत असतो. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवत असतात. त्यामुळे आम्ही कायम रुग्णांना सांगत असतो की मोबाइलचा वापर कमी करा. लहान वयात लहान मुलांना चष्मे लागले आहेत. त्यांच्या दृष्टीवर परिणाम होत आहे, तसेच नागरिकांच्या एकाग्रतेवर आणि स्मरणशक्तीवर याचा परिणाम होत आहे. डिप्रेशनही अनेकांना येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर घातक आहे, याचा काळजीपूर्वक वापर लोकांनी केला पाहिजे.    
- डॉ. निर्मल सूर्या, न्यूरोफिजिशियन, बॉम्बे हॉस्पिटल

मोबाइल वापराचा परिणाम काय? 
मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे, तसेच अनेक तास एकाच जागी मोबाइलचा वापर करत असल्यामुळे शारीरिक कसरती कमी होतात. परिणामी लठ्ठपणा वाढतो. त्यानंतर लठ्ठपणा वाढल्यामुळे अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये विशेष करून मधुमेह, रक्तदाबाच्या व्याधींना सामोरे जावे लागते. तसेच मानेच्या आणि पाठीच्या दुखण्याला आमंत्रण दिले जाते.  

मेंदूशी संबंधित आजार कोणते? 

 कामावर लक्ष केंद्रित न होणे. 
 एकाग्रता भंग पावणे. 
 मायग्रेशनचा त्रास होणे. 
 स्मरणशक्तीवर परिणाम. 

Web Title: Brain disease due to the use of mobile? Sleep problems and insomnia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.