Join us

उन्मळून पडलेल्या झाडांच्या खोडासह फांद्या पदपथांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:06 AM

पादचाऱ्यांना त्रासलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तौउते चक्रीवादळात मुंबईत हजारो झाडे उन्मळून पडली. मात्र, दोन आठवडे उलटूनदेखील या ...

पादचाऱ्यांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तौउते चक्रीवादळात मुंबईत हजारो झाडे उन्मळून पडली. मात्र, दोन आठवडे उलटूनदेखील या झाडांच्या छाटलेल्या फांद्या, तसेच खोड अद्यापही पदपथांवर तसेच रस्त्यांवर पडून आहेत. यामुळे पादचाऱ्यांना, तसेच वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या फांद्यांचे ढीग ठिकठिकाणी जमा झाल्याने त्या परिसराला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक परिसर विद्रूप दिसत आहेत. त्यामुळे चक्रीवादळ झाल्यानंतर साचलेल्या या फांद्या व खोड नेमके उचलणार तरी कधी, असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

काही दिवसांतच मुंबईत मान्सून दाखल होईल. यानंतर याच फांद्या नाल्यांमध्ये अडकून नाले तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या फांद्या लवकरात लवकर उचलून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

फोटो -

काळाचौकी येथील अभ्युदयनगरमधील पदपथावरील फांद्यांचा ढीग.

...................................................