Break the chain : 'मतदानानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातही कडक निर्बंध लागू होतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 11:08 PM2021-04-13T23:08:45+5:302021-04-13T23:10:00+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.

Break the chain : 'Strict restrictions will be imposed in Pandharpur-Mangalvedha constituency after polling', uddhav thackery | Break the chain : 'मतदानानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातही कडक निर्बंध लागू होतील'

Break the chain : 'मतदानानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातही कडक निर्बंध लागू होतील'

Next
ठळक मुद्देएक अपवाद आपल्याला करावा लागणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात निवडणूक असल्याने तेथे आपण काही दिवसांसाठी शिथिलता देत आहोत.

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे. १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत राज्यांत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मतदान होईपर्यंत हे निर्बंध शिथिल ठेवण्यात आले आहेत. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कडक निर्बंधांना ब्रेक द चेन असे नाव दिले आहे. राज्यात 1 मे पर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. त्यानुसार राज्यात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या काळात पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक असल्याने नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, मतदान झाल्यानंतर तेथेही हे कडक निर्बंध लागू राहणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  

एक अपवाद आपल्याला करावा लागणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात निवडणूक असल्याने तेथे आपण काही दिवसांसाठी शिथिलता देत आहोत. या मतदारसंघातील आपले लोकप्रतिनिधी भारत भालके यांचेही कोरोनामुळेच निधन झाले. दुर्दैवाने ते आपल्यातून गेले, येत्या 2-4 दिवसांत तेथे मतदान होत आहे. मात्र, मतदान झाल्यानंतर तिकडेही हे निर्बंध अत्यंत कडकपणाने लागू होतील. त्यामुळेच, आपण मला आजपर्यंत जसं सहकार्य केलं, तसंच यापुढेही करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. 

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यासंदर्भात परिपूर्ण नियमावली जाहीर करुन तेथील नागरिकांना याबाबत अवगत करतील.  

Web Title: Break the chain : 'Strict restrictions will be imposed in Pandharpur-Mangalvedha constituency after polling', uddhav thackery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.