Join us

मोडू पण वाकणार नाही; कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 3:31 AM

वडाळा बेस्ट आगारासमोर आंदोलन : राजकीय व्यासपीठावर चर्चा करण्यास नकार

मुंबई : बेस्ट कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कामगारांना घरे खाली करण्याच्या नोटिसा धाडल्याच्या निषेधार्थ कर्मचाºयांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी आक्रमक पवित्रा घेतला. मोडू पण वाकणार नाही, अशी घोषणा देत कर्मचाºयांच्या पत्नींनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी बेस्टच्या वडाळा आगारासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी कृती समितीचे नेते शशांक राव यांनी कृती समितीचा कोणताही नेता राजकीय व्यासपीठावर चर्चा करण्यास जाणार नसल्याची घोषणा केली.

दरम्यान, बेस्ट कर्मचारी पत्नींनी केलेल्या आंदोलनामुळे आगाराकडे जाणारे दोन्ही मार्ग पोलिसांना बंद करावे लागले. बेघर होण्याची भीती दाखवत प्रशासन कर्मचाºयांचा संप चिरडू पाहत असल्याच्या प्रतिक्रिया कामगार पत्नींनी व्यक्त केल्या. तसेच कामगारांनी घाबरण्याची गरज नसून सर्व कामगारांच्या पत्नी त्यांच्या आंदोलनात पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचा विश्वास देण्यासाठी हा मोर्चा काढल्याचे महिलांचे म्हणणे होते. दरम्यान, कर्मचारी पत्नींनी वडाळा आगारासमोरच ठिय्या दिल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गासह वडाळा आगाराकडे जाणारा मार्ग पोलिसांना सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला होता.

या वेळी आमदार नितेश राणे यांनी संपकरी कर्मचाºयांसह ठिय्या आंदोलन करणाºया कर्मचारी पत्नींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. नितेश राणे म्हणाले की, कोणत्याही चॉकलेटला न भुलता लेखी आश्वासनाशिवाय कामगारांनी आंदोलन मागे घेऊ नये. याआधीही २०१७ला आश्वासनामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र अद्याप प्रश्न जैसे थे आहेत. राजकीय व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय योग्य आहे. पोलिसांनीही कर्मचाºयांवर केसेस दाखल करू नये, असे आवाहन राणे यांनी केले. तसेच कामगारांनी आता माघार घेतली, तर गिरणी कामगारांप्रमाणे पुन्हा रस्त्यावर उतरता येणार नाही, असेही राणे म्हणाले. विरोधी पक्षनेते रवी राजा, कामगार नेते सुनील गणाचार्य यांनीही वडाळा येथे येत कर्मचाºयांच्या पत्नींनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला.म्युनिसिपल मजदूर युनियनचा पाठिंबाच्बेस्ट कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाला मुंबई महापालिका कर्मचारी व अधिकाºयांच्या म्युनिसिपल मजदूर युनियनने गुरुवारी जाहीर पाठिंबादिला आहे.च्शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच लक्ष न दिल्याने बेस्ट कामगारांचा प्रश्न चिघळल्याची प्रतिक्रिया युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुखदेव काशिद यांनी व्यक्त केली आहे. तसेच महापालिका व राज्य शासनाने तत्काळ तोडगा काढून जनतेसह कामगारांना दिलासा देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :बेस्टमुंबई