मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते विरार या स्थानकांदरम्यान कचºयाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पावसात रुळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्थानकालगतच्या रहिवाशांसह प्रवाशांमध्येही जनजागृती सुरू केली आहे.मुंबई सेंट्रल, माटुंगा, वांद्रे, माहिम, कांदिवली, मालाड, अंधेरी, विरार या स्थानकांदरम्यान कचºयाचे प्रमाण अधिक आहे. रेल्वेलगतच्या वस्तीतून रुळांवर कचरा फेकला जातो. या प्रकरणी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल कारशेडचे नुकतेच निरीक्षण केले. त्यानंतर रेल्वे रुळांवरील कचºयाच्या समस्येचे निवारण करण्यासाठी जनजागृतीचे सुरू करण्यात आली.दरम्यान, गुप्ता यांनी लोकलचा निळा लुकलुकणारा दिवा, महिला डब्यांमधील सीसीटीव्ही, आपत्कालीन टॉकबॅक यंत्रणा यांचेही निरीक्षण केले. मान्सून्ममध्ये कारशेडमध्ये पाणी साचते. त्यावर उपाय शोधण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या.कचरा वर्गीकरणाची गरजरेल्वे रुळावर कचºयाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांसह स्थानिकांनाही त्रास होतो. पावसाचे पाणी रुळावर साचते. कचरा फेकणाऱ्यांवर पश्चिम रेल्वेने कारवाई करावी. रहिवाशांत जनजागृती केली पाहिजे. रहिवाशांनी सुका, ओला कचरा असे वर्गीकरण करून कचरा पेटीत टाकावा, असे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी सांंगितले.कचºयामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचते. त्यामुळे लोकलसेवा विस्कळीत होते. आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे जनजागृती हाती घेतली आहे. आरपीएफ, सामाजिक संस्थेतर्फे रहिवाशांमध्ये जागृती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच मुंबई सेंट्रल, विरार, अंधेरी या स्थानकांवर जनजागृती करण्यात आली.- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे मार्गावरील कचऱ्यामुळे पावसाळ्यात लोकल सेवेला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 3:26 AM