Breaking: एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या; आज पोलीस कोठडी संपत होती

By गौरी टेंबकर | Published: September 8, 2023 10:58 AM2023-09-08T10:58:24+5:302023-09-08T11:39:21+5:30

बिल्डिंगमध्ये विक्रम हाऊस किपिंगचे काम करायचा.

Breaking: Accused of murdering air hostess Rupal commits suicide in lockup; Police custody was ending today | Breaking: एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या; आज पोलीस कोठडी संपत होती

Breaking: एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या; आज पोलीस कोठडी संपत होती

googlenewsNext

एअर हॉस्टेस रुपलची हत्या करणाऱ्या आरोपीने सकाळी अंधेरी परिसरात असलेल्या पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी विक्रम अटवाल याने पॅन्टचा सहाय्याने गळफास लावून घेतल्याची घटना आज सकाळी 6.30 च्या सुमारास घडली आहे. 

रुपलच्या हत्या प्रकरणी अटवाल याला ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानुसार त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते. पवई येथे राहणाऱ्या रुपल आग्रे नावाच्या एअर होस्टेसच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रमला अटक केली होती. तो सध्या पोलीस कोठडीत होता.

 काही वेळात आरोपीचा मृतदेह जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तिथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. बिल्डिंगमध्ये विक्रम हाऊस किपिंगचे काम करायचा.
 

Web Title: Breaking: Accused of murdering air hostess Rupal commits suicide in lockup; Police custody was ending today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.