Breaking: ईडी कार्यालयात जाणार नाही; शरद पवारांकडूनच घोषणा, कारणही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 02:03 PM2019-09-27T14:03:53+5:302019-09-27T14:05:44+5:30

Sharad Pawar Vs ED : सकाळपासून पवारांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु होती. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेरही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते.

Breaking: I will not visit the Enforcement Directorate office for now Says Sharad Pawar | Breaking: ईडी कार्यालयात जाणार नाही; शरद पवारांकडूनच घोषणा, कारणही सांगितलं!

Breaking: ईडी कार्यालयात जाणार नाही; शरद पवारांकडूनच घोषणा, कारणही सांगितलं!

Next

मुंबई - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपपत्रात नाव नसताना गुन्हा दाखल कसा केला? असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी ईडी कार्यालयात स्वत:हून जाणार असल्याचं सांगितलं होतं. आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते. पोलिसांनीही दक्षिण मुंबईत कलम 144 लागू केलं होतं. पवारांनी घराबाहेर पडू नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते अशी विनंती पोलिसांनी शरद पवारांनी केली.   

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, सहआयुक्त विनय चौबे यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सकाळपासून पवारांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु होती. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेरही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते. अनेक कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांकडून करण्यात येत होती. तर राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांना वाशी, ठाणे येथे अडवून त्यांना ताब्यात घेण्यात येत होतं. या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि शरद पवारांची बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवारांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पोलिसांच्या विनंतीला मान देत ईडी कार्यालयात जाणार नाही असं स्पष्ट केलं. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, 24 तारखेला पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं होतं की, आज मी ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्या बँकेत मी संचालक नव्हतो, सभासद नव्हतो असं असताना माझ्यावर गुन्हा दाखल केला. मी चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे. आचारसंहिता लागल्यानंतर मी राज्यभर निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणार आहे. त्यामुळे मी चौकशीपासून पळ काढतोय असं अर्थ निघू नये यासाठी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. 

मात्र जनमानसात प्रतिमा खराब करण्यासाठी असे आरोप करण्यात आले आहे. ईडीने कळविलं की तुम्ही याठिकाणी यायची गरज नाही, तूर्तास कोणतीही चौकशी नाही असं स्पष्ट केलं. मुंबई पोलिसांनीही भेट दिली. महाराष्ट्रात संतापाची लाट आहे, त्याची प्रतिक्रिया शहरात, जिल्ह्यात दिसायला लागली आहे. मुंबईबाहेर लोकांना अडविलं जात आहे. या सर्व गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते. मी स्वत: गृह खातं सांभाळलं आहे. माझ्या कोणत्या कृतीमुळे लोकांना त्रास होईल असं मी वागणार नाही त्यामुळे मी ईडी कार्यालयात जाणार नाही असं सांगत शरद पवारांनी कार्यकर्त्यांचे तसेच पाठिंबा दिलेल्या पक्षांचे आभार मानले. या संपूर्ण प्रकरणातून महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांची एकजूट दिसून आली असंही विधान शरद पवारांनी केलं.  

महत्वाच्या बातम्या

पवारांवरील ईडी कारवाईमुळे भाजपाची कोंडी; सरकारविरोधात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र

हे आमचं सरकार नाही; ईडी कारवाईविरोधात शिवसेना शरद पवारांच्या पाठिशी

देशातील लोकशाही संकटात; मुस्कटदाबी होणार असेल तर सहन करणार नाही - धनंजय मुंडे  

विरोधीपक्षातील आमदारांचं कारकून सुद्धा ऐकत नाही; मनसेत असताना मी अनुभवलं - हर्षवर्धन जाधव

भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाक हतबल, UNमधील भाषणाआधीच इम्रान खान यांनी मानली हार!

धर्म आणि सैनिकांच्या नावावर भाजपाकडून राजकारण - अशोक गहलोत

Web Title: Breaking: I will not visit the Enforcement Directorate office for now Says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.