Join us

फेरीवाल्यांच्या विळख्याने कोंडतोय दादरचा श्वास; कारवाईनंतरही लागतात ठेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 3:05 AM

रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम मार्गांना जोडणाऱ्या दादर रेल्वे स्थानकाचा श्वास पुन्हा कोंडू लागला आहे. दादर परिसरासह रेल्वे स्थानकाच्या पादचारी पूलावर पुन्हा फेरीवाले विळखा घालू लागले आहेत़ त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

- चेतन ननावरेमुंबई : रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम मार्गांना जोडणाऱ्या दादर रेल्वे स्थानकाचा श्वास पुन्हा कोंडू लागला आहे. दादर परिसरासह रेल्वे स्थानकाच्या पादचारी पूलावर पुन्हा फेरीवाले विळखा घालू लागले आहेत़ त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.दादर रेल्वे स्थानकावरील मध्य रेल्वेचे ६ आणि पश्चिम रेल्वेचे ४ अशा एकूण १० फलाटांवर रोज लाखो प्रवाशांची गर्दी असते. या गर्दीला वाट करून देण्यासाठी प्रशासनाने रेल्वे स्थानकाच्या चारही बाजूने मार्ग काढून दिले आहेत. स्थानकाला कोणत्याही स्कायवॉकने जोडले नसल्याने स्थानक गाठण्यासाठी आणि स्थानकातून बाहेर पडण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवाशी स्थानकावरील पादचारी पूलाचा वापर करतात. काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने पादचारी पुलावर सातत्याने कारवाई करत येथील फेरीवाल्यांना सळो की पळो करून सोडले होते. मात्र मध्य रेल्वेवरील दक्षिणेकडील पादचारी पुलावर पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान मांडण्यास सुरूवात केली आहे. रान मेव्यासह सुंगधी द्रव्ये, कपडे यांची विक्री करणारे फेरीवाले दक्षिणेकडील पादचारी पुलावर असतात.अशीच काहीशी परिस्थिती स्थानकाच्या पश्चिमेकडे आहे. पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांक एकला जोडून असलेल्या स्थानकाबाहेर मुंबई महापालिकेची फेरीवाल्यांवर कारवाई करणारी गाडी उभी असते.या गाडीशेजारी कोणताही फेरीवाला भटकत नाही. याउलट गाडीपासून हाकेच्या अंतरावर आणि स्थानकाच्या १५० मीटर परिसरात सर्व फेरीवाले बिनदिक्कत धंदा करतात. प्रशासन आणि अनधिकृत फेरीवाल्यांमधील साटेलोटेमुळे हा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती स्थानिक दुकानदार देतात.स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या केशवसुत उड्डाणपुल येथून बेस्टच्या ५६, ११०, १५१ आणि १७१ क्रमांकाच्या बसेस सुटतात. सणासुदीला या मार्गावरील फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे सर्वच बसेसना कबुतर खाना येथूनच वळण घ्यावे लागते. याशिवाय रोजच पदपथाला लागणाºया अनधिकृत फेरीवाल्यांमुळे बसेसना कोंडीचा सामना करावा लागत असल्याची माहिती बेस्ट कर्मचाºयांनी दिली.रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडील पादचारी पूलाच्या मदतीने पूर्वेकडून पश्चिमेला जाणाºया प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. महत्त्वाची बाब म्हणजे याच ठिकाणी असलेले फूल मार्केट गाठण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. येथील अनधिकृत फेरीवाल्यांना नेमके कोणाचे अभय आहे? हे सर्वश्रुत असल्याची प्रतिक्रिया अधिकृत विक्रेते व्यक्त करतात.- रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडील पादचारी पूलावरून पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांक २ व ३ वर जाण्यासाठी खूपच अरूंद पूल असल्याचे दिसते. या पूलावर असलेल्या तिकीटघराबाहेर होणारी प्रचंड गर्दी पूल उतरणाºया आणि चढणाºया प्रवाशांच्या मार्गात अडथळा ठरते. त्यामुळे गर्दीच्या वेळी याठिकाणी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :दादर स्थानक