लाचखोर साहाय्यक धर्मादाय आयुक्त दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 05:54 AM2018-10-23T05:54:31+5:302018-10-23T05:54:41+5:30
जमिनीचा निकाल मार्गी लावण्यासाठी ५० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला साहाय्यक धर्मादाय आयुक्त अनिल शिंगणे याला विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
Next
मुंबई : जमिनीचा निकाल मार्गी लावण्यासाठी ५० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला साहाय्यक धर्मादाय आयुक्त अनिल शिंगणे याला विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्याला ३ वर्षांची कैद आणि १ हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
वरळी येथील धर्मादाय
आयुक्त कार्यालयात शिंगणे
कार्यरत होता. २०१० मध्ये तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे पुणे येथील जमिनीसंदर्भात पुण्याच्या शहर दिवाणी न्यायालयासह पुणे सह धर्मादाय आयुक्तांकडे खटला सुरू होता.