लाचखोर सिडको साहाय्यक अभियंत्याला अटक
By admin | Published: December 13, 2014 01:29 AM2014-12-13T01:29:48+5:302014-12-13T01:29:48+5:30
बिलाची रक्कम अदा करण्यासाठी ठेकेदाराकडे लाच मागणा:या सिडकोच्या सहाय्यक अभियंत्याला शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली.
Next
नवी मुंबई : बिलाची रक्कम अदा करण्यासाठी ठेकेदाराकडे लाच मागणा:या सिडकोच्या सहाय्यक अभियंत्याला शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. खारघर येथील सिडकोच्या विभागीय कार्यालयातच तो लाचेची रक्कम स्वीकारत असताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
संदीप धामने (42) असे अटक केलेल्या सिडकोच्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. खारघर येथील सिडकोनिर्मित गोल्फ कोर्सच्या दुरुस्तीचे काम नुकतेच झाले होते. मात्र हे काम करणा:या ठेकेदाराला कामाचे बिल अदा करण्यात आले नव्हते. हे थकीत बिल मंजूर करून घेण्यासाठी धामनेने ठेकेदाराकडे 12 हजार रुपयांची लाच मागितली. यासंदर्भात सदर ठेकेदाराने धामने यांच्याविरोधात नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर येथील सिडको कार्यालयात सापळा रचला होता. यावेळी धामने यांना लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार. सिडकोचे अधिकारी लाच मागत असल्यास नागरीकांनी सिडको अथवा लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी.
- डॉ. प्रज्ञा सरवदे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको
संयुक्त कारवाई
तक्रारदाराने धामने हे लाच मागत असल्याची तक्रार सिडकोकडे देखिल केली होती. त्यानुसार सिडको आणि लाच लुचपत प्रतिबंध विभागाने संयुक्तरित्या
या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.