नेव्हीतील ‘त्या’ लाचखोर अधिकाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 06:25 AM2018-12-02T06:25:53+5:302018-12-02T06:25:56+5:30

नौदल अधिकारी-कर्मचा-यांच्या गृहनिर्माण सोसायटीत खासगी क्लास सुरू करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेणा-या कमांडर व प्रशासकीय अधिका-याला, केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने अटक केली.

 The 'bribe' officer in the Navy was arrested | नेव्हीतील ‘त्या’ लाचखोर अधिकाऱ्याला अटक

नेव्हीतील ‘त्या’ लाचखोर अधिकाऱ्याला अटक

Next

मुंबई : नौदल अधिकारी-कर्मचा-यांच्या गृहनिर्माण सोसायटीत खासगी क्लास सुरू करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेणा-या कमांडर व प्रशासकीय अधिका-याला, केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने अटक केली. मोहम्मद हुसेन मुजावर असे त्याचे नाव असून, कांजूरमार्ग येथील कॉलनीत शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
नौदलाची कांजूरमार्ग (प.) येथे हौसिंग सोसायटी आहे. या ठिकाणी राहात असलेल्या एका सदस्याने सोसायटीमध्ये सखी सेल व शिक्षणाबाबत खासगी क्लास चालविण्याची मागणी केली होती. मुजावरने त्यासाठी पहिल्यांदा २५ हजार रुपयांची मागणी केली. अखेर २० हजारांवर तडजोड करण्यात आली. मात्र, फिर्यादीला लाच द्यावयाची नसल्याने, त्याने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कक्षाकडे त्याबाबत तक्रार केली. त्यानुसार, शुक्रवारी प्रशासकीय अधिकारी मुजावर हे तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारत असताना पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याचे कार्यालय व घराची तपासणी करून कागदपत्रे जप्त केली. न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची कोठडी मिळाली.

Web Title:  The 'bribe' officer in the Navy was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.