Join us

बस आगार व्यवस्थापकावर लाचखोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 3:09 AM

मरोळ बस आगार व्यवस्थापक आदेश चंद्रदास खरे (५७) याच्याविरुद्ध लाच मागितल्या प्रकरणी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. बस आगारातीलच उपाहारगृहाबाबतचा नकारात्मक अहवाल न पाठविण्यासाठी त्याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

मुंबई : मरोळ बस आगार व्यवस्थापक आदेश चंद्रदास खरे (५७) याच्याविरुद्ध लाच मागितल्या प्रकरणी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. बस आगारातीलच उपाहारगृहाबाबतचा नकारात्मक अहवाल न पाठविण्यासाठी त्याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.अंधेरीच्या मरोळ बस आगारात तक्रारदार यांच्या भावाचे उपाहारगृह आहे. उपाहारगृहातील खाद्यपदार्थ, तसेच सेवा यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी खरेवर सोपविण्यात आली होती. याच उपाहारगृहाबाबत नकारात्मक अहवाल पाठवू नये, म्हणून खरेने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाचदेखील मागितली. यामुळे तक्रारदार गोंधळून गेला. चांगली सेवा देऊनही खरे पैशांसाठी दबाव आणत असल्याने, त्याने खरे याला विरोध करायचे ठरवले. काहीही झाले तरी पैसे न देण्याचा निर्णय तक्रारदाराने घेतला. त्यानुसार, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.एसीबीच्या चौकशीत खरे याने ५ हजारांची मागणी केल्याचे उघड झाले. त्यानंतर, एसीबीने शुक्रवारी खरेविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :गुन्हा