वनविभागाचा लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By मनीषा म्हात्रे | Published: March 28, 2023 07:55 PM2023-03-28T19:55:38+5:302023-03-28T19:55:45+5:30

महेंद्र गिते असे अधिकाऱ्याचे नाव असून ते गोराई बोरिवलीच्या कांदळवन संधारण घटक (पश्चिम मुंबई) येथे कार्यरत आहे.

Bribery officer of forest department in ACB's net | वनविभागाचा लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

वनविभागाचा लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

googlenewsNext

मुंबई :

व्यावसायिक गाळ्यावर निष्कासनाची कारवाई करू नये यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनविभागाच्या राउंड ऑफिसर विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा नोंदवला आहे.  महेंद्र गिते असे अधिकाऱ्याचे नाव असून ते गोराई बोरिवलीच्या कांदळवन संधारण घटक (पश्चिम मुंबई) येथे कार्यरत आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तसेच साक्षीदार यांच्या  व्यावसायिक गाळ्यांवर वनविभागामार्फत निष्कासन कारवाई न करण्यासाठी   गिते याने ५ लाखांची मागणी केली. तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेत ७ डिसेम्बर रोजी तक्रार दिली. त्यानुसार, एसीबीने केलेल्या पडताळणीत पैसे मागितल्याची स्पष्ट होताच, मंगळवारी गीते विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी एसीबीकडून अधिक तपास सुरु आहे. 

Web Title: Bribery officer of forest department in ACB's net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.