लाचखोर पोलीस हवालदार डाकेस सक्तमजुरी

By Admin | Published: August 2, 2014 12:33 AM2014-08-02T00:33:59+5:302014-08-02T00:33:59+5:30

पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन त्यातील एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना माणगावच्या पोलीस हवालदार अनंत गणपत डाके याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.

Bribery Police Havalakar Dakas Sakamamajuri | लाचखोर पोलीस हवालदार डाकेस सक्तमजुरी

लाचखोर पोलीस हवालदार डाकेस सक्तमजुरी

googlenewsNext

अलिबाग : पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन त्यातील एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना माणगावच्या पोलीस हवालदार अनंत गणपत डाके याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. माणगांव न्यायलयातील सत्र न्यायाधीश पी.आर.भरड यांनी सुनावणी अंती त्याला दोषी ठरवून, तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रपये दंड, व दंड न भरल्यास २ महिने अधिक कारावास व लाचलूचपत प्रतिबंधक कायदा कलम १३ (१) ब प्रमाणे ४ वर्ष सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस हवालदार अनंत गणपत डाके माणगांव पोलीस ठाण्यात कार्यरत असताना, २१ मे २००८ रोजी या समीर मधूकर जोशी, हे पुणे येथून ताम्हाणी घाट मार्गे माणगांव येथे गाडीने येत असताना गाडी रस्त्यावरुन खाली जाऊ न अपघात झाला. अनंत डाके यांनी त्या गुन्ह्याचा तपास करुन पंचनामा व तक्रारदार यांचे जबाब घेतले व त्यांच्या गाडीचे कागदपत्र ताब्यात घेतले व तुम्ही स्वत:च्या हलगर्जीपणामुळे अपघात केला आहे म्हणून तुम्हाला १८४ कलम लावतो असे सांगून त्याच्याकडून २५ हजार रुपयांच्यामागणी केली होती.

Web Title: Bribery Police Havalakar Dakas Sakamamajuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.