कोरोना संकटातही लाचखोरी जोरात; महसूल, पोलीस सर्वात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:06 AM2021-07-30T04:06:02+5:302021-07-30T04:06:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या महामारीतही लाचखोरी सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत. यात महसूल, पोलीस विभागाची आघाडी ...

Bribery is rampant in the Corona crisis; Revenue, police at the forefront | कोरोना संकटातही लाचखोरी जोरात; महसूल, पोलीस सर्वात पुढे

कोरोना संकटातही लाचखोरी जोरात; महसूल, पोलीस सर्वात पुढे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या महामारीतही लाचखोरी सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत. यात महसूल, पोलीस विभागाची आघाडी कायम आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे लाचखोरीला ब्रेक लागला. मात्र अनलॉकचा टप्पा सुरू होताच लाचखोरी जैसे थे स्वरूपात पाहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी मुंबईत लाचखोरीप्रकरणी ६६३ गुह्यांची नोंद झाली. त्यात ६३० सापळा कारवाईचा समावेश आहे. २०१९च्या तुलनेत हा आकडा २३६ ने कमी आहे. यात एसीबीच्या पुणे परिक्षेत्रात सर्वाधिक १४२ गुन्हे नोंद आहे. पुणे परिक्षेत्राअंतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लाचखोरी सुरूच आहे. अशात, गेल्या वर्षभराच्या आकडेवारीत महसूल विभाग आघाडीवर होते. त्याखालोखाल पोलीस दलाची आघाडी होती. महसूल विभागात केलेल्या १५६ कारवाईत २१७ जण, तर पोलीस दलातील १५४ कारवाईत २१८ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले.

कोणत्या वर्षात किती कारवाया

गुन्हे सापळा कारवाई

२०१८ ९३६ ८९१

२०१९ ८९१ ८६६

२०२० ६६३ ६३०

....

विभागनिहाय कारवाई

(यावर्षी १ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंतची कारवाई)

विभाग प्रकरण आरोपी

महसूल/ /नोंदणी - १६ १९

पोलीस - १८ - ३०

महावितरण - १३ / १९

महानगरपालिका - ६/ ९

पंचायत समिती - ७/१०

अन्न व नागरी पुरवठा - १/१

बांधकाम - १/२

आरोग्य - २/ ३

शिक्षण - ३/ ३

पुण्यात सर्वाधिक कारवाया

यावर्षी १ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान एसीबीने जारी कलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक २२ कारवाया करण्यात आल्या आहेत. यात, २८ आरोपी एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्याखालोखाल नाशिक, औरंगाबादमध्ये कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही पुण्यात (१४२) सर्वाधिक कारवाई करण्यात आल्या आहेत.

लाच देणेही गुन्हाच

लाच मागणे जसा गुन्हा आहे तसेच देणेदेखील गुन्हा असल्याचे एसीबीचे म्हणणे आहे. कोणी लाच मागत असल्यास तत्काळ एसीबीकडे धाव घ्या किंंवा एसीबीच्या १०६४ हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीकडून करण्यात येत आहे.

Web Title: Bribery is rampant in the Corona crisis; Revenue, police at the forefront

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.