मनाने तरुण असणा:यांसाठी पुल महोत्सव
By admin | Published: November 12, 2014 01:11 AM2014-11-12T01:11:52+5:302014-11-12T01:11:52+5:30
पूर्णविरामाने गोष्ट संपत असेलही, पण पूर्णविराम काढल्याने त्या गोष्टीचा अखंड प्रवास सुरू होतो. पुल आणि युवा यांना जोडण्यासाठी पुल महोत्सव नावाचा सेतू बांधण्याचा प्रयत्न केला आहे.
Next
पूर्णविरामाने गोष्ट संपत असेलही, पण पूर्णविराम काढल्याने त्या गोष्टीचा अखंड प्रवास सुरू होतो. पुल आणि युवा यांना जोडण्यासाठी पुल महोत्सव नावाचा सेतू बांधण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच पु.ल. असे न लिहिता पुल असे लिहीत आहे. 2क्क्8 सालापासून पुल युवा महोत्सव मोठय़ा थाटात साजरा होतो. यंदाच्या महोत्सवाची सांगता बुधवारी होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांच्याशी महेश चेमटे यांनी साधलेला संवाद..
पु.ल. देशपांडे यांचे गारुड अजूनही कायम आहे, आपण काय सांगाल?
- पु.ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महोत्सव भरवण्यात आला आहे. पुलदाणी या कार्यक्रमातून पुल यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. यंदा पुल युवा महोत्सवाचे 7 वे वर्ष आहे. तरुणांना डोळ्यापुढे ठेवून महोत्सवातील कार्यक्रमांची बांधणी केलेली आहे. याआधी शासनाच्या कार्यक्रमात तरुणांचा कमी प्रमाणात सहभाग होता. या महोत्सवात तरुणांच्या आवडीनिवडी लक्षात घेतल्या आहेत. त्यामुळे तरुण मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत. तरुण पिढीला पु.ल. देशपांडे यांचे विविध पैलू समजण्यासाठी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला हा उत्तम प्रयत्न आहे. पारंपरिक लोककला आणि आधुनिक संस्कृती असा दुग्धशर्करा योग या पाच दिवसीय महोत्सवात रसिकांना अनुभवायला मिळाला. या महोत्सवाची ओळख ‘तरुणांचा पुल युवा
महोत्सव’ म्हणून झाली पाहिजे, असा माझा व माङया सहका:यांचा मानस आहे.
यंदाचा पुल महोत्सव तुम्ही कोणाला समर्पित करत आहात?
- वयानेच नाही तर मनाने तरुण असणा:यांसाठी हा महोत्सव समर्पित आहे. शाहिरी, नाटक, लोकनृत्य, एकांकिका, मल्लखांब, रॉकबॅण्ड, भरतनाटय़म अशा विविध कलांचे सादरीकरण या महोत्सवात होत आहे. महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे कॅडियन शास्त्रीय नृत्य म्हणजेच श्रीलंकेच्या संस्कृतीचे नृत्याद्वारे होणारे सादरीकरण. भारतातील धिमसा, लेझीम, गौर नाच, होजागिरी, ढोल नाच, कोळी, रनप्पा ही लोकनृत्येही आकर्षण ठरली.
मुंबईसोबत नागपूर, पुणो, कोल्हापूर येथूनदेखील
कलाकार आलेले आहेत. त्या कलाकारांची राहण्याची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आली आहे. आजचे तरुण इंटरनेटसोबत वाहत चालले आहेत. इंटरनेट वाईट नाही, पण अति तेथे माती असे
म्हणतात, अशा तरुणांना महाराष्ट्रातील कलांचा परिचय करून देण्यासाठी शासनाच्या मदतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. यंदाच्या महोत्सवाची सांगता पुल यांनी लिहिलेल्या ‘वा:यावरची वरात’ या नाटकाने होणार आहे.
तरुणाईला आकर्षून घेण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न के लेत?
- सोशल मीडियाची वाढती क्रेझ लक्षात घेऊन तरुणांर्पयत पोहोचण्यासाठी ‘पुल युवा महोत्सव’चे पेज फेसबुकवर तयार करण्यात आले होते. त्याचप्रमाणो विविध सोशल नेटवर्किग साइटवर अपडेट राहण्यासाठी आम्ही तरुणांना नेमले होते. जास्तीत जास्त
तरुणांनी महोत्सवाला येण्याचे आवाहन
आम्ही सातत्याने केले. त्याचा फायदादेखील होत असल्याचे आम्हाला दिसून आले.
लोककलांसाठी शासनाची भूमिका कशी पूरक आहे?
- सरकार लोककलाकारांसाठी पालकांच्या भूमिकेने काम करत आहे. महाराष्ट्र शासनाकडे खूप चांगले प्रकल्प, विविध योजना लोककलावंतांसाठी आहेत. त्या पोहोचण्यात थोडे कमी पडत आहोत. शासन चित्रपटांना, नाटकांना अनुदान देते. त्याचबरोबर लावणी महोत्सव, शाहिरी महोत्सव, खडीगंमत महोत्सव, तमाशा महोत्सव यांचे आयोजन करते. ज्येष्ठ लोककलावंतांना निवृत्तिवेतनदेखील देण्यात येत आहेत. सरकार लोककलाकारांसाठी पालकांच्या भूमिकेने कार्यरत
आहे.