Join us

पुलाची दुरुस्ती लटकलेलीच! रेल्वे, महापालिका भूमिकेवर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 1:52 AM

लोअर परळ, डिलाईल पुलावरील धोकादायक भाग बॅरिकेट्स लावून पादचाऱ्यांसाठी शनिवारी सुरू करण्यात आला. मात्र या पुलाच्या दुरुस्तीबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.

मुंबई : लोअर परळ, डिलाईल पुलावरील धोकादायक भाग बॅरिकेट्स लावून पादचाऱ्यांसाठी शनिवारी सुरू करण्यात आला. मात्र या पुलाच्या दुरुस्तीबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. रेल्वे आणि महापालिका प्रशासन आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे. दुसरीकडे पुरेशा नियोजनाआधीच पूल बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.महापालिका, रेल्वे, आयआयटी यांच्यामार्फत करण्यात आलेल्या संयुक्त पाहणीनंतर डिलाईल पूल बंद करण्यात आला. मात्र यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ती दूर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने रेल्वे आणि महापालिका प्रशासनामध्ये बैठक झाली. बैठकीत यामध्ये दुसºयांदा पुलाची पाहणी करून पादचारी व हलक्या वाहनांसाठी सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार शुक्रवारी रात्री हा पूल पादचाºयांसाठी खुला झाला आहे.पूल पाडण्यासाठी विशेष ब्लॉकरेल्वे व पालिकेच्या वादात हजारो प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. शनिवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात पुलाच्या नियोजनाबाबत रेल्वे व महापालिकेच्या अधिकाºयांची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत डिलाईल रोड पूल पाडण्यासाठी रेल्वेने संमती दर्शविली आहे. पूल पाडण्याचे काम हाती घेण्यापूर्वी पालिकेने त्यावरील केबल्सच्या वायरी, पाइप लाइन हटवावे, असे म्हटले आहे. पूल पाडण्यासाठी निविदा काढण्यात येणार असून, त्यानंतर विशेष ब्लॉक घेऊन पूल पाडण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयाने दिली.दुरूस्तीबाबत तोडगा नाहीचरेल्वेच्या बैठकीत पूल बांधण्याबाबत चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने कनिष्ठ अभियंत्यांना बैठकीत पाठविल्याने पुलाच्या बांधणीबाबत सविस्तर चर्चा करता आली नाही. यामुळे रेल्वे मुख्यालयातून पालिकेला पूल बांधण्याबाबत पत्र पाठविले जाईल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकºयाने सांगितले. एमआरव्हीसीवर पुलाच्या बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.वाहतूककोंडी कायम : रहदारीसाठी पूल खुला झाला, तरी वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे दक्षिण मध्य मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न जैसे थे आहे. माहिम ते थेट महालक्ष्मी भायखळापर्यंत वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून वाहनचालकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासनाची ‘हद्द’ झालीपुलाची दुरुस्ती कोणी व कधी करावी? याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे गोंधळाची स्थिती कायम आहे. या पुलाच्या बांधकामासाठी किमान दोन वर्षे लागतील. कोणतेही नियोजन न करताच हा पूल बंद करून रेल्वेने अडचणीत भर घातली आहे. महापालिका आपल्या परीने सर्व सहकार्य करीत आहे. पण रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे काम त्यांनाच करावे लागेल, असे महापालिकेच्या एका अधिकाºयाने सांगितले. यासंदर्भात पूल विभागाचे प्रमुख शीतलाप्रसाद कोरी यांना वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हद्दीमुळे पालिका, रेल्वे प्रशासन आपापल्या भूमिकेवर ठाम असले तरी त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने हद्द केली, असा नाराजीचा सूर प्रवाशांमध्ये आहे.

टॅग्स :मुंबई