पुल धोकादायक नव्हता, किरकोळ दुरुस्ती सुरू होती, विनोद तावडे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 09:58 PM2019-03-14T21:58:25+5:302019-03-14T21:59:02+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील एक पादचारी पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील एक पादचारी पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या पुलाची महानगरपालिका आणि रेल्वेने तपासणी केली होती. तसेच हा पुल तितकासा खराब झालेला नव्हता. तसेच शिफारशीनुसार त्याची डागडुगी सुरू होती. मात्र काम होईपर्यंत हा पूल बंद का करण्यात आला नव्हता याचा तपास झाला पाहिजे, असे विनोद तावडे यांनी सांगितले. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर योग्य उपचार दिले जातीत. तसेच अधिक माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40), भक्ती शिंदे (40), झाहीद सिराज खान (32), तपेंद्र सिंह (35) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
Maha Min Vinod Tawde: A slab of the bridge had collapsed. Railways&BMC will conduct an inquiry into its maintenance. Bridge wasn't in a bad condition, it required minor repairs for which work was underway. Why was it not closed until the work was completed, it'll also be probed. pic.twitter.com/kkPYIMtNug
— ANI (@ANI) March 14, 2019
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील कामा रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर 34 जण जखमी झाले आहेत.
सीएसएमटी परिसरात बरीच कार्यालये असून चाकरमानी घरी जाण्याच्या वेळेस म्हणजेच वर्दळीच्या वेळी ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, कामा रुग्णालयातून सीएसएमटीकडे येणारा दरवाजा बंद करण्यात आला आहे. या पुलाजवळ अंजुमन इस्लाम ही शाळा असून अनेकजण कार्यालयात आणि रेल्वे स्थानकाकडे जाण्या - येण्यासाठी या पुलाचा वापर केला जातो.