मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील एक पादचारी पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या पुलाची महानगरपालिका आणि रेल्वेने तपासणी केली होती. तसेच हा पुल तितकासा खराब झालेला नव्हता. तसेच शिफारशीनुसार त्याची डागडुगी सुरू होती. मात्र काम होईपर्यंत हा पूल बंद का करण्यात आला नव्हता याचा तपास झाला पाहिजे, असे विनोद तावडे यांनी सांगितले. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर योग्य उपचार दिले जातीत. तसेच अधिक माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40), भक्ती शिंदे (40), झाहीद सिराज खान (32), तपेंद्र सिंह (35) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पुल धोकादायक नव्हता, किरकोळ दुरुस्ती सुरू होती, विनोद तावडे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 9:58 PM