'भोला'ने केले पाकिस्तानचे तुकडे, भारतीय उपखंडाच्या इतिहासातील चक्रीवादळं
By अोंकार करंबेळकर | Published: December 5, 2017 11:28 AM2017-12-05T11:28:12+5:302017-12-05T11:41:16+5:30
ओखी वादळ सोमवारपासून (4 डिसेंबर) मुंबईच्या किना-यावर घोंघावतंय त्यामुळे कोकण किनारपट्टीवर त्याला तोंड देण्यासाठी जोरदार तयारी आणि संरक्षणाच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
मुंबई- ओखी वादळ सोमवारपासून (4 डिसेंबर) मुंबईच्या किना-यावर घोंघावतंय त्यामुळे कोकण किनारपट्टीवर त्याला तोंड देण्यासाठी जोरदार तयारी आणि संरक्षणाच्या उपाययोजना केल्या जात आहेत. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अशी वादळं कमी संख्येने व कमी तीव्रतेने येत असली तरी पूर्व किनार्यावर मात्र चक्रीवादळांनी नेहमीच तडाखे दिलेले आहेत.
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर १९७० च्या नोव्हेंबर महिन्यात आलेल्या भोला वादळामुळे मात्र उपखंडाचा नकाशा बदलण्याच्या प्रक्रियेलाच वेग आला. या वादळामुळे उपखंडाचा नकाशा, इतिहास, भूगोल, राजकीय आणि सामरिक परिस्थिती बदलून गेली. या भोला वादळने भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आणि तत्कालीन पूर्व पाकिस्तानात बंगालच्या उपसागरातून प्रवेश केला. ८ नोव्हेंबरपासून वेगाने वारे वाहायला सुरु झाल्यावर १२ नोव्हेंबर रोजी सा वादळाने खरे रुप दाखवून दिले. वादळ अत्यंत वेगात असताना वार्याचा वेग प्रतिताशी १८५ किमी इतका वाढलेला होता. वादळाच्या चार दिवसांत पूर्व पाकिस्तानचे जबरदस्त नुकसान झाले होते. ५ लाख बंगालींना आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र या वादळावेळी पश्चिम पाकिस्तानातील राजकारणी नंडळी हातावर हात ठेवून बसली असा आरोप होऊ लागला. पूर्व पाकिस्तानी जनतेमध्ये यामुळे असंतोष वाढीला लागला. आधीच पंजाबी पाकिस्तानी लोकांची आणि त्यांच्या भाषेची दडपशाही त्यात ही वादळामुळे वाढलेला असंतोष त्यांच्या संतापात भर घालत होती. वादळानंतर एका महिन्यात झालेल्या मतदानात हा असंतोष बंगाली लोकांनी दाखवून दिला. अवामी लीग हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष बनला व त्यानंतर १९७१ साली झालेला रणसंग्राम व पर्यायाने पाकिस्तानचे झालेले विभाजन सर्वांना माहिती आहेच. पण लोकांचा असंतोष वाढवण्यासाठी केवळ सरकार पाडण्यापुरतेच नव्हे तर देशाचे विभाजन होण्यासाठीही कारण ठरलेल्या मुद्द्यांपैकी एक होऊ शकते हे भोलाने साडेचार दशकांपुर्वी दाखवून दिले होते. १९६५ साली पूर्व पाकिस्तानात आलेल्या एका चक्रीवादळाने १० हजार लोकांचे प्राण गेले होते.
१८६४ साली आलेल्या कोलकाता चक्रीळादळाने ६० हजार लोकांचे प्राण गेले होते त्यानंतर पूर्व किना-यावर १८६७, १८७४ या वर्षी वादळे आली होती. १८७६ साली आलेल्या ग्रेट बाकरगंज वादळामुळे १ लाख लोकांचे प्राण गेले होते व वादळानंतर पसरलेल्या रोगराईमुळे आणखी १ लाख लोकांचे प्राण गेले १८८५ साली एडन, १८९० साली ओडिशामध्ये तर १८९० साली मस्कत ही वादळे आली. तसेच १८९५ मध्ये ओडिशात पुन्हा वादळ आले व आजच्या पाकिस्तानच्या किना-यावर मकराणजवळ बलुचिस्तान प्रांतात वादळ थडकले होते.
१९०२ व १९०७, १९४४ साली कराचीत वादळ थडकले तर १९४२ साली बंगालमध्ये आलेल्या वादळाने ४० हदार लोकांचे प्राण गेले. त्यानंतर १९४६ साली आंध्र प्रदेशात आलेल्या वादळामुळे ३० हजार लोकांच्या जीवनावर परिणाम झाला. १९५६ साली आसाममध्येही वादळाने जनजीवन विस्कळीत झाले हौते. १९६६ साली मद्रास, १९६७ ओडिशा, १९६८ म्यानमार, १९६९ आंध्र प्रदेश अशी अनेक वादळे भारतीय उपखंडाने अनुभवली आहेत.
भोला वादळामुळे पूर्व पाकिस्तानात उद्धवस्त झालेले जनजीवन
भारतातील चक्रीवादळे
पश्चिम बंगाल
१९७० -भोला
१९८१- बीओबी ०३
१९८८- बीओबी ०३
१९९७- बीओबी ०७
१९९८- बीओबी ०६
२०००- बीओबी ०४
२००२- बीओबी ०३
२००७- सिद्र
२००८- रश्मी
२००९- ऐला
२०१५- कोमेन
२०१६- रोणू
२०१७- मोरा
ओडिशा
१९७०- भोला
१९९६- बीओबी ०६
१९९९- बीओबी ०५
२०१३- फायलीन
तामिळनाडू
१९९१- बीओबी ०९
१९९२- बीओबी ०६
१९९३- बीओबी ०३
१९९६- ०८बी
२०००- बीओबी ०५
२००५- फानूस
२००८- निशा
२०१०- जल
२०११- ठाने
२०१२- नीलम
२०१३- माडी
२०१६- रोणू
२०१६- क्याट
२०१६- नाडा
२०१७- वरदा
२०१७- ओखी
गुजरात
१९९६ - एआरबी ०१
१९९८- एआरबी ०२
१९९८- एआरबी ०५
२००१- एआरबी ०१
२००४- ओनील
२००७- येम्यीन
२०१५- एआरबी ०२
आंध्र प्रदेश
१९९०- बीओबी ०१
१९९८-बीओबी ०५
२००३- ०३ बी
२००७- येम्यीन
२००८- क्यायमुक
२०१०- लैला
२०१२- नीलम
२०१३- हेलन
२०१३- लेहर
२०१४- हुदहूद
२०१६- क्यात
महाराष्ट्र
१९९४- एआरबी ०२
२००९- फयान