थोडक्यात बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:13 AM2021-01-13T04:13:19+5:302021-01-13T04:13:19+5:30

मुंबई : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दादर येथील सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात विशाखा पंकज भुजबळ यांच्या हस्ते ...

Brief news | थोडक्यात बातम्या

थोडक्यात बातम्या

Next

मुंबई : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दादर येथील सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात विशाखा पंकज भुजबळ यांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोट्यवधी मुंबईकरांचे प्राण वाचविणाऱ्या पालिका आरोग्य सेवकांना सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त करणे हीच त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उत्सवानिमित्ताने आदरांजली ठरेल, असे मत परिषदेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सदानंद मंडलिक यांनी व्यक्त केले.

गानसरस्वती पुरस्कार

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या गानसरस्वती २०२० पुरस्कार मंजुषा पाटील यांना जाहीर झाला आहे. स्वर्गीय किशोर आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी त्यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलेल्या या पुरस्कारे एक लाख रुपये आणि मानपत्र असे स्वरूप आहे.

मराठी भाषा पंधरवडा

मुंबई : राज्यात १४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. मराठी भाषासंदर्भातील विविध उपक्रम राज्यभर राबविले जाणार आहेत. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश संबंधित विभागांना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिले.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.