थोडक्यात ५ बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:06 AM2021-01-18T04:06:07+5:302021-01-18T04:06:07+5:30
मुंबई : पोयसर जिमखाना मार्गावर पोयसर आगार ते नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण दरम्यान महानगरपालिकेने पाइपलाइनचे काम सुरू केल्याने बसमार्ग ...
मुंबई : पोयसर जिमखाना मार्गावर पोयसर आगार ते नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण दरम्यान महानगरपालिकेने पाइपलाइनचे काम सुरू केल्याने बसमार्ग क्रमांक २२३, २३९, २७६, २७७ साईबाबानगर, पवार हायस्कूलमार्गे अप दिशेने चारकोपकडे जाताना परावर्तित केलेे आहेत. हे काम अंदाजे ८ दिवस चालेल.
_______________
बसमार्ग खंडित
मुंबई : भांडूप नरदासनगर येथे महानगरपालिकेचे पाइपलाइनचेे काम सुरू असल्याने बसमार्ग ६०६ नरदासनगर येथे खंडित करण्यात आला आहे. नवजीवन शाळा व सर्वोदयानगर बसथांबा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. सदर काम एक महिना चालेल.
_______________
मेट्रो प्रशिक्षण वर्ग
मुंबई : मेट्रो ट्रायल रन्सजवळ येत आहे तसतसे प्रत्येक टीम विविध प्रशिक्षणांमध्ये भाग घेत आहे. पीएसटी टीम येथे मेट्रो गाड्यांच्या पाॅवरिंगसाठी ओएचई देखभालीचे प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली.
_______________
कोंडी कायम
मुंबई : कुर्ला ते अंधेरी या रस्त्यावरील काळे मार्ग येथे अवजड वाहने अनधिकृतरीत्या उभी केली जातात. यामुळे हा रस्ता आणखी अरुंद होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
_______________
महापूजा
मुंबई : साकीनाका येथील शारदा शाळा परिसरात श्री मनिकंठा भक्तवृंदतर्फे आयोजित श्री अय्यप्पा महापूजेत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी भाग घेतला. यावेळी सुभाष गुरुस्वामी, रत्नाकर शेट्टी आदी उपस्थित होते.
_______________