ब्रिमस्टोवँड पूर्ण क्षमतेने व्हावे - अच्युत राईलकर, निवृत्त अभियंता, मुंबई महानगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 03:03 PM2017-08-30T15:03:11+5:302017-08-30T15:07:25+5:30

स्टाँर्म वाँटरचा निचरा होण्यासाठी जी ब्रिमस्टोवँड योजना केलेली आहे ती पूर्ण क्षमतेने लागू व्हायला हवी, त्याचे नियोजन १९९५ या वर्षावर आधारीत आहे

Brimstown should be done in full capacity - Achyut Rayilkar, retired engineer, Mumbai Municipal Corporation | ब्रिमस्टोवँड पूर्ण क्षमतेने व्हावे - अच्युत राईलकर, निवृत्त अभियंता, मुंबई महानगरपालिका

ब्रिमस्टोवँड पूर्ण क्षमतेने व्हावे - अच्युत राईलकर, निवृत्त अभियंता, मुंबई महानगरपालिका

Next

मुंबई, दि. 30 - स्टाँर्म वाँटरचा निचरा होण्यासाठी जी ब्रिमस्टोवँड योजना केलेली आहे ती पूर्ण क्षमतेने लागू व्हायला हवी, त्याचे नियोजन १९९५ या वर्षावर आधारीत आहे. तसेच त्याच्या १२०० कोटींपैकी केवळ २६० कोटी रुपयेच खर्च झाले आहेत.  प्रतिताशी ५० मीमी पाऊस पडल्यावर साचणा-या पाण्याचा निचरा त्यात केला जातो पण त्यापेक्षा जास्त पडला तर काय करायचे याचे अद्याप नियोजन नाही. पुर्वी तर त्याची मर्यादा केवस प्रतीताशी २५ मीमी इतक्या पावसापर्यंत होती. नाल्यांची पूर्ण स्वच्छता होणे आवश्यक आहे तरच पूर्ण क्षमतेने पाण्याचा निचरा होईल. त्यासाठी निधीची व लोकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. 

याबरोबरच दुसरा मुद्दा येतो तो अतिक्रमणाचा. पाण्याचा निचरा होण्यासाठी खरी गरज असते ती जागा आणि निधीची. आपल्याकडे या व्यवस्थेवर अतिक्रमणाचा हल्ला झाला आहे. नाल्यांच्या शेजारी घरे दाटीवाटीने बांधली जातात व कधकधी पात्रांवरही अतिक्रमण होते. त्यामुळे त्यांचेही सांडपाणी, कचरा नाल्यातच मिसळला जातो. मुंबईत मिठीनदीसह सर्व नाल्यांच्या नशिबी अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे. जोवर या जागा मोकळा श्वास घेणार नाहीत तोवर सफाई व्यवस्थित होणार नाही.  पालिकेने पुढील उपाय राबवले तर ते अधिक चांगले होऊ शकेल 

पाणी पुरवठा २४ तास झाला पहिजे, मलजल व पर्जन्य जल वाहिन्या साफ करून त्यांचे नूतनीकरण करायला हवे. 

सर्व मलजलाची समुद्रात फेकण्यापूर्वी प्रक्रिया करून टाकण्याची योजना पूर्ण करायला हव्यात. घनकचरा डंपिंगची योग्य योजना हातात घ्यावयास हवी. मुंबईच्या रस्त्यावरची वाहतूकनियोजन करायला हवे. 

सर्व खड्डे भरून टाकावयास हवे व रस्त्यांची कामे सुव्यवस्थित रचनेची असावी. रस्ते स्वच्छ ठेवायला हवेत. कार पार्किंगची व्यवस्था हवी. 
रस्त्यावरच्या विक्रेत्यांची जागा नक्की करून अनधिकृत ठिकाणचे विक्रेते हटवायला हवेत. मुंबईची रुग्णालये पुरेशा औषधाने व इतर साधनाने युक्त ठेवावीत. समुद्र किनारे सुरक्षित ठेवावे.  हवा व पाणी शुद्ध राहण्याकरता पालिकेची तजवीज आवश्यक.. मोबाईल टॉवर इमारतीवर लावण्याचे नियम कडकपणे अमलात आले पाहिजेत. वाहतूक समस्येचे निराकरण व्हायला हवे. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष देऊन समस्येंचे निराकरण करणे.
 

Web Title: Brimstown should be done in full capacity - Achyut Rayilkar, retired engineer, Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.