मतदानासाठी बाळालाही आणा, दोन हजार केंद्रांवर पाळणाघर; आयोगाकडून सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 10:45 AM2024-03-02T10:45:28+5:302024-03-02T10:47:50+5:30

मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून सुविधा. 

bring baby to vote too nursery at 2000 centres facility from election commission | मतदानासाठी बाळालाही आणा, दोन हजार केंद्रांवर पाळणाघर; आयोगाकडून सुविधा 

मतदानासाठी बाळालाही आणा, दोन हजार केंद्रांवर पाळणाघर; आयोगाकडून सुविधा 

मुंबई :  मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांची अंतिम मतदारयादी जाहीर झाली आहे. यावेळी एकूण ९६ लाख मतदार मुंबईत आहेत. त्यासाठी उपनगरात आजघडीला ८३५३ मतदान केंद्र आहेत. या केंद्रावर पाळणाघरांची तसेच पाणी-ज्यूसची सोय केली जाणार आहे. मुंबई आणि  उपनगरातील मतदारांची लोकसंख्या पाहता निवडणूक आयोगाने मतदार केंद्रांची संख्या वाढवली आहे. मतदारांना घराजवळच मतदान केंद्र उपलब्ध व्हावीत, म्हणून ८ हजार ३५३ मतदान केंद्र आजघडीला आहेत.  शहरातील हजारो मतदान केंद्र झोपडपट्टी आणि चाळ परिसरात आहेत. शासकीय, खासगी शाळा, आरोग्य केंद्र, मैदाने, समाज केंद्र अशा स्थळांचा त्यासाठी आश्रय घेतला जातो. 

प्रत्येक केंद्रावर मिळणार ओआरएस :

१) गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केंद्रावर उष्णतेच्या त्रासाने एका शासकीय कर्मचारी आणि मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 

२) यंदा भर उन्हाळ्यात मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर पाणी आणि ओआरएस उपलब्ध केले जाणार आहे. 

आरोग्य कर्मचारीही राहणार : आगामी लोकसभेसाठी मार्च ते मे दरम्यान मतदान अपेक्षित आहे. हे महिन्यात कडक उन्हाळा असल्याने मुंबई सारख्या शहरात दिवसा आणि रात्री सुद्धा उकाडा राहण्याची शक्यता असते. अशावेळी वाढत्या उन्हामुळे मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचारी, अधिकारी तसेच मतदारांना उन्हाचा त्रास होऊ शकतो. 

जागेची कमतरता पाहता केवळ दोन हजार केंद्रांवर सध्या पाळणाघर सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

उपनगरात आजघडीला जरी ८ हजार मतदान केंद्र आहेत. त्यात वाढही होऊ शकते. तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला जात आहे. निवडणूक जाहीर होताच त्याचे चित्र अधिक स्पष्ट होईल. मात्र निवडूक विभागाकडून पूर्ण तयारी झालेली असल्याचे उपनगर निवडणूक कार्यालयाचे म्हणणे आहे.

उपनगरात मतदार केंद्रे ७००० : एकूण ९६ लाख मतदार मुंबईत आहेत. त्यासाठी उपनगरात आजघडीला ८३५३ मतदान केंद्र आहेत. 

Web Title: bring baby to vote too nursery at 2000 centres facility from election commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.