Raj Thackeray: १४ जूनला येताना झाडाचं रोप अन् शैक्षणिक साहित्य आणा; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 03:03 PM2023-06-12T15:03:21+5:302023-06-12T15:03:56+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे.

Bring saplings and educational materials on arrival on June 14; Raj Thackeray's appeal to workers | Raj Thackeray: १४ जूनला येताना झाडाचं रोप अन् शैक्षणिक साहित्य आणा; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Raj Thackeray: १४ जूनला येताना झाडाचं रोप अन् शैक्षणिक साहित्य आणा; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

googlenewsNext

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. यादिवशी त्यांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी असते. प्रत्येकाला भेटता यावं याकरता राज ठाकरे यादिवशी खास वेळ बाजूला काढून ठेवतात. यावेळी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते राज ठाकरेंचं निवास्थान असलेल्या शिवतीर्थावर भेटण्यासाठी येतात. 

राज ठाकरेंनी यंदाच्या वाढदिवसानिमित्त नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. फेसबुक पोस्ट लिहित राज ठाकरे म्हणाले की, दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे, असं राज ठाकरेंनी या फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे. 

Web Title: Bring saplings and educational materials on arrival on June 14; Raj Thackeray's appeal to workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.