मुंबई - अनेकांच्या स्वप्नाचं शहर म्हणजे मुंबई. हजारो लोक मुंबईत येत असतात, मुंबईतील खाऊ गल्ल्या पाहिल्या तर तुडुंब गर्दीने भरलेल्या असतात. मुंबईची मज्जा जगायला कुणाला आवडणार नाही? सर्वसामान्य मुंबईकरांचा दिवस घालवण्यासाठी ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवरून प्रसिद्ध स्नॅक्सवर ताव मारला.
मिस्टर एलिस यांनी स्नॅकचा आनंद लुटतानाचे दोन फोटो सोशल मीडियात शेअर केले. फोटोत मिस्टर एलिस मुंबईतील सँडविच आणि चिली आइस्क्रीमचा आनंद घेताना दिसत आहेत. अॅलेक्स एलिसने यांनी लिहिलंय की, आज मुंबईकरांसारखे खातोय. मुंबई सँडविच आणि आईस्क्रीम खाण्याचा प्रयत्न करतोय. बॉम्बे सँडविच." इतकंच नाही तर त्यांनी मराठीत ' या जेवायला' हे कॅप्शनही जोडलं आहे. एलिस यांनी हे दोन फोटो गुरुवारी ट्विटरवर शेअर केले आहेत. ही पोस्ट २ लाख ६६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे.
त्यांच्या पोस्टनंतर, अनेक ट्विटर युजर्सने पुढे काय प्रयत्न करावे याबद्दल त्यांच्या सूचना दिल्या. एका युजर्सने विचारले, "तुम्ही कधी राजौरी गार्डनमधून छोले भटुरे ट्राय केलं आहे का?" दुसर्या युजर्सने लिहिले, "हाय अॅलेक्स, आशा आहे की तुम्ही सहमत आहात की मुंबई सँडविच स्वतःच्या लीगमध्ये एक आहे आणि अधिक ओळखीसाठी पात्र आहे?" या पोस्टवर लोकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.