मनीषा म्हात्रे - मुंबई
दलालांच्या नजरेतून कुठलीच सरकारी, निमसरकारी कार्यालये सुटलेली नाहीत. दलालांची ही किड तहसील कार्यालयांनाही लागली असून विविध दाखले मिळवून देण्यासाठी हा दलालवर्ग चक्क चार हजारांवर रक्कम मागत असून ‘लोकमत’ने दलालांचे हे बिंग स्टिंग ऑपरेशनद्वारे फोडले आहे.
दहावी आणि बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विद्याथ्र्याना नॉन क्रिमिलेअर आणि डोमिसाइल सर्टिफिकेटची आवश्यकता असते. शिवाय, इंजिनिअरिंग अभ्यासक्रमालाही नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटशिवाय प्रवेश मिळत नाही. हे सर्टिफिकेट मिळविण्यासाठी विद्यार्थिवर्गाची तहसील कार्यालयालगत गर्दी होत असून मुलुंड तहसील कार्यालयाचीदेखील हीच अवस्था झाली आहे. या तहसील कार्यालयाला किमान सहा ते सात दलालांचा विळखा पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे मुळात विद्याथ्र्याना अर्ज करासहित संबंधित दाखला 45 रुपयांमध्ये मिळतो. शिवाय, अर्ज दाखल केलेल्या तारखेपासून त्यांना 15 दिवसांचा कालावधी दिला जातो. मात्र, अधिकारीवर्गाची टंगळ-मंगळ, दाखल्यावर स्वाक्षरीसाठीचा विलंब, अशी अनेक कारणो पुढे करून यासाठी महिने लावले जातात. परिणामी, विद्याथ्र्याची फरफट होते. तहसील कार्यालयात येणा:या विद्याथ्र्याना हाताशी धरण्यात हा दलाल वर्ग माहिर झाला आहे. कमी पैशांत काम करून देण्याचे आमिष दाखवत विद्याथ्र्याना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी दलालांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.
विद्याथ्र्याची फरफट होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. दलालांकडून फसवणूक होत असलेल्यांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात. आम्ही संबंधितांवर कारवाई करू. मात्र, अशा प्रकरणांत नागरिक पुढाकार घेत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे दलालांपासून सुटका व्हावी म्हणून आम्ही टपाल योजना सुरु केली आहे, जेणोकरून अर्ज दाखल केल्यानंतर दाखले घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- ज्योती वाघ (तहसीलदार, मुलुंड)
खुला प्रवर्गातील विद्याथ्र्याना अशा दाखल्यांची नितांत आवश्यकता असते. ते मिळाले नाही तर बहुतेक वेळा कागदपत्रंअभावी विद्याथ्र्याना प्रवेश मिळत नाही. अर्ज दाखल केलेल्या तारखेपासून 15 दिवसांच्या कालावधीत हे दाखले देणो बंधनकारक आहे. - अॅड. गीता पाटील
असा झाला दलालासोबत संवाद..
प्रतिनिधी : बहिणीच्या अॅडमिशनसाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट काढायचे आहे.
दलाल : काम होईल; 4 हजार रुपये लागतील.
प्रतिनिधी : चार हजार!!! अहो; आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यात अॅडमिशनसाठी पैसे भरायचे आहेत.
दलाल : मग 500 रुपये कमी होतील; त्याच्या खाली नाही!
प्रतिनिधी : पण काम होईल ना?
दलाल : दगडाच्या देवावर विश्वास ठेवता. 33 कोटी देव आहेत. यातल्या एका देवाला तरी कधी पाहिले का? माणसावर विश्वास ठेवून बघा.
प्रतिनिधी : ठीक आहे. किती दिवसांत काम होईल.
दलाल : आठवडाभरात दाखला तुमच्या हातात मिळेल.
प्रतिनिधी : पैसे दिल्यावर
पावती मिळेल ना.
दलाल : नाही.. नाही.. पावती कशाला? पावती पाहिजे असेल तर एक्स्ट्रा 500 रुपये लागतील. कारण, अधिका:यांनाही पैसे द्यावे लागतात. त्यात पावतीची गडबड असेल तर जास्तीचे पैसे देऊन काम करावे लागते आणि तशीही पावतीची गरज काय? विश्वास ठेवा; आठवडाभरात दाखला मिळेल.