बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स तिसऱ्या वर्षाचे निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:04+5:302021-07-25T04:06:04+5:30

८४.२३% विद्यार्थी उत्तीर्ण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या अंतिम वर्षाच्या मे २०२१ मध्ये ...

BSc Computer Science Third Year Results Announced | बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स तिसऱ्या वर्षाचे निकाल जाहीर

बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स तिसऱ्या वर्षाचे निकाल जाहीर

Next

८४.२३% विद्यार्थी उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या अंतिम वर्षाच्या मे २०२१ मध्ये झालेल्या उन्हाळी सत्राच्या विज्ञान शाखेचा तिसऱ्या वर्षाच्या बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल ८४.२३ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या होत्या.

या परीक्षेत एकूण ३ हजार ०२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला ३ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ७५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, तर ९ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. परीक्षेत ४३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शुक्रवारी एकूण ११ परीक्षांचे निकाल जाहीर

विद्यापीठाने काल दिवसभरात एकूण ११ परीक्षांचे निकाल जाहीर केले. यात बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स सत्र ६ सोबत बीई (मेकॅनिकल इंजिनियरिंग) सत्र ७, बीकॉम (फायनान्शियल मॅनेजमेंट) सत्र ५, बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट) सत्र ५, बीई (सिव्हिल इंजिनीयरिंग) सत्र ८, बीई (कॉम्प्युटर इंजिनीयरिंग ) सत्र ८, बीई (केमिकल इंजिनीयरिंग) सत्र ७, बीकॉम ( इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट) सत्र ५, बीकॉम (फायनान्शियल मॅनेजमेंट) सत्र ६, बीएस्सी सत्र ५ (७५.२५), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज) सत्र ५ या परीक्षांच्या निकालांचा समावेश आहे.

Web Title: BSc Computer Science Third Year Results Announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.