Join us

बी.एस्सी. सत्र ५ परीक्षेचा निकाल ४० टक्के; एकूण ३,२९८ विद्यार्थी उत्तीर्ण

By रेश्मा शिवडेकर | Published: January 03, 2024 8:26 PM

बीएस्सी सत्र ५ च्या परीक्षेमध्ये एकूण ३,२९८ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या अंतिम वर्षाच्या ऑक्टोबर २०२३ मध्ये संपन्न झालेल्या हिवाळी सत्राच्या विज्ञान विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ५ या परीक्षेचा निकाल ४०.०२ टक्के इतका लागला आहे. 

बीएस्सी सत्र ५ च्या परीक्षेमध्ये एकूण ३,२९८ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ८ हजार ६५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार २५२ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर ४०१ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ४९४२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तसेच या परीक्षेत १२ कॉपी केसेस झाल्या आहेत. 

या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून कोणताही निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले. ३० दिवसाच्या आत बीए, बीकॉम, बीएस्सी निकाल जाहीर 

पारंपरिक अभ्यासक्रम बीए, बीकॉम, बीएस्सी या परीक्षेचे निकाल विद्यापीठाने निर्धारित वेळेत म्हणजे ३० दिवसाच्या आत जाहीर केले आहेत. विद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या हिवाळी सत्राचे ३२ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर  प्रदर्शित करण्यात आले आहेत.

टॅग्स :परीक्षा