Join us

रिचार्ज करु  न शकणाऱ्या ग्राहकांना 5 मे पर्यंत इनकमिंग कॉलची सुविधा देण्याचा बीएसएनएलचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 7:09 PM

घराबाहेर पडणे शक्य नसल्याने व रिचार्ज करणे अशक्य झाल्याने ज्यांची मुदत समाप्त झाली आहे.

 

मुंबई : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडणे शक्य नसल्याने व रिचार्ज करणे अशक्य झाल्याने ज्यांची मुदत समाप्त झाली आहे, अशा ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बीएसएनएलने त्यांना 5 मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

लॉकडाऊनमुळे रिचार्ज करण्यासाठी दुकाने बंद असल्याने अनेक ग्राहकांना रिचार्ज करता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्लँनची वैधता समाप्त झाल्याने त्यांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. ऑनलाइन रिचार्ज करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन बीएसएनएलतर्फे करण्यात आले आहे मात्र तरीही ज्यांना ऑनलाइन रिचार्ज करता येणे शक्य नाही त्यांना इनकमिंग कॉलची सुविधा कायम राहण्यासाठी पाच मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

घर बैठे रिचार्ज व अपनो की मदद से रिचार्ज अशा दोन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. घर बैठे रिचार्ज योजनेत ग्राहकाने त्याचा क्रमांक नोंदवल्यावर बीएसएमएलचे प्रतिनिधी त्यांच्या घपी जातील व त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज करुन देतील. अपनो की मदद से रिचार्ज योजनेत ग्राहकाला त्याच्या नातेवाईकाकडुन किंवा मित्राकडून रिचार्ज मिळवणे शक्य होईल. ही योजना सध्या उत्तर व पश्चिम विभागात कार्यरत असुन पूर्व व दक्षिण विभागात 22 एप्रिल पासून राबवण्यात येईल. 

बीएसएनएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार म्हणाले,  ग्राहकांना सध्याच्या अडचणीच्या काळात विनामुल्य इनकमिंग सुविधा पुरवणे ही आमची सामाजिक जबाबदारीचा भाग आहे. ग्राहकांनी आता डिजिटल पेमेंट पध्दतीकडे वळण्याची गरज निर्माण झाल्याचे ते म्हणाले. डिजिटल पेमेंट साठी बीएसएनएलचे मोबाइल अँप, वेबसाइट व इतर पर्यायांचा वापर केला जावू शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

 

टॅग्स :बीएसएनएलकोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्या