Join us

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे वेतन आठवडाभरात होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 5:59 AM

एमटीएनएल कर्मचाऱ्यांप्रमाणेच बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

मुंबई : एमटीएनएल कर्मचाऱ्यांप्रमाणेच बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून, आठवडाभरात वेतन होण्याची शक्यता आहे. तरीही विलंब झाल्यास १५ मार्चपूर्वी निश्चितच वेतन होईल, अशी माहिती बीएसएनएल एम्प्लॉइज युनियनचे महाराष्ट्र परिमंडळ सचिव नागेशकुमार नलावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.बीएसएनएलच्या इतिहासात प्रथमच असा गंभीर प्रसंग ओढावला आहे. त्यामुळे कर्मचारी व अधिकाºयांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वेतन प्रलंबित राहिले आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.गेल्या दोन वर्षांपूर्वी बीएसएनएलचा नफा ३० हजार कोटी होता. मात्र, बाजारपेठेतील स्पर्धेमुळे आता ती तोट्यात आहे. नफा मिळविण्याचा विचार न करता, आम्ही केवळ सेवा पुरविण्याच्या हेतूने देशाच्या कानाकोपºयात सुविधा पुरवितो. त्यामुळे आम्ही खासगी कंपनीच्या केवळ नफ्यावर आधारित स्पर्धेमध्ये काहीसे मागे पडणे साहजिक आहे, असेही नलावडे म्हणाले.>‘सरकार जबाबदारी टाळू शकत नाही’बीएसएनएलची देशभरात लाखो कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तिची मालकी दूरसंचार खात्याकडे आहे. मात्र, दूरसंचार खाते या मालमत्तेवर कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी देण्यात टाळाटाळ करत आहे. त्यामुळे बीएसएनएलसमोरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. सरकारी कंपनी असल्याने वेतन देण्याची पूर्ण जबाबदारी सरकारची आहे. सरकार ही जबाबदारी टाळू शकत नाही.>सहनशीलतेचा अंत पाहू नका!बीएसएनएल कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेतर्फे दिल्लीत आंदोलन करून पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, सीमेवरील सद्यस्थिती लक्षात घेऊन आम्ही हे आंदोलन सध्या स्थगित केले आहे. सरकारने बीएसएनएल कर्मचाºयांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

टॅग्स :बीएसएनएल