‘बीएसएनएल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विमा सप्टेंबरपर्यंत हवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 01:26 AM2020-06-21T01:26:51+5:302020-06-21T01:26:57+5:30

बीएसएनएल एम्प्लॉइज युनियनने तशी मागणी बीएसएनएल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

'BSNL retired employees need medical insurance by September' | ‘बीएसएनएल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विमा सप्टेंबरपर्यंत हवा’

‘बीएसएनएल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विमा सप्टेंबरपर्यंत हवा’

googlenewsNext

मुंबई : बीएसएनएलच्या सेवानिवृत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विम्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवून हवी आहे. बीएसएनएल एम्प्लॉइज युनियनने तशी मागणी बीएसएनएल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बीएसएनएलच्या सेवानिवृत कर्मचाºयांचा वैद्यकीय विमा, मेडिकल कार्डची मुदत ३० जूनला समाप्त होत आहे. बीएसएनएलच्या कॉर्पोरेट कार्यालयाने हा वैद्यकीय विमा ३० जूनपर्यंत अथवा पुढील आदेश येईपर्यंत वैध राहील, असे पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते. मात्र अनेक सर्कल कार्यालयांत या पत्राचा अर्थ योग्य पद्धतीने लावण्यात आला नाही. त्यामुळे सेवानिवृत कर्मचाºयांवर आॅप्शन फॉर्म भरण्याची सक्ती करण्यात आली. ३० जूनपूर्वी वैद्यकीय विमा कार्ड नव्याने वैध करून घ्यावे, असे निर्देश देण्यात आले. मात्र सध्या कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे ज्येष्ठ व सेवानिवृत्त कर्मचाºयांना ही प्रक्रिया करण्यास अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत या वैद्यकीय विम्याची मुदत वाढवावी, अशी मागणी बीएसएनएल एम्प्लॉइज युनियनने बीएसएनएलचे महाव्यवस्थापक (प्रशासन) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस पी. अभिमन्यू यांनी दिली.

Web Title: 'BSNL retired employees need medical insurance by September'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.