'बीएसएनएलची सेवा सुरूच राहणार, खासगीकरण नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 04:42 AM2020-02-23T04:42:39+5:302020-02-23T04:42:49+5:30
पुढील चार महिन्यांनंतर वेतन वेळेवर मिळणार
- खलील गिरकर
मुंबई : तोट्यात असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएएनएल)च्या स्वेच्छानिवृत्तीला मोठा प्रतिसाद मिळाल्याने, वेतनावर खर्च होणाऱ्या रकमेत मोठी बचत होणार आहे. मात्र, अजूनही कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसून, त्यांच्या कामातील ताण वाढला आहे. या संदर्भात बीएसएनएलचे महाराष्ट्र व गोवा सर्कलच्या मुख्य महाव्यवस्थापक मनोजकुमार मिश्रा यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या कर्मचारी, अधिकाºयांची देणी त्यांना कधी मिळणार?
बीएसएनएलच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. देशात बीएसएनएलच्या १ लाख ५३ हजार ७८६ कर्मचाºयांपैकी ७८ हजार ५६९ जणांनी, तर महाराष्ट्रातील १३ हजार ६७२ कर्मचाºयांपैकी ८,५४४ जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यांना देय असलेली सर्व देणी वेळेवर देण्यात येत आहेत. कर्मचाºयांना जीपीएफ देण्याची प्रक्रिया सुरू असून, निम्म्यापेक्षा जास्त जणांना जीपीएफ दिला आहे. उर्वरित कर्मचाºयांना तो २८ फेब्रुवारीपर्यंत मिळेल. त्यांना १ मार्चपासून प्रोव्हिजन पेन्शन सुरू करण्यात येईल. कोणाचीही देणी रखडणार नाहीत.
प्रश्न : कर्मचाºयांना वेळेवर वेतन मिळत नाही. याबाबत उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत का?
स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या देशभरातील कर्मचाºयांच्या वेतनावर खर्च होणाºया वार्षिक सात हजार कोटींची बचत होईल. राज्यातील कर्मचाºयांच्या वेतनावर खर्च होणाºया वार्षिक ६०० कोटी रुपयांची बचत होईल. याचा वापर अन्य कर्मचाºयांसाठी करण्यात येईल. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाºयांची देणी देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, या संदर्भात इतर आवश्यक उपाययोजना आखण्यात येतील. त्यामुळे पुढील ३-४ महिन्यांनंतर कर्मचाºयांना दर महिन्याचे वेतन वेळेवर मिळेल.
सेवा सुरूच राहणार
बीएसएनएलचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही. विविध उपाययोजनांद्वारे ही सेवा कायम सुरू ठेवण्यात येईल.
पुनरुज्जीवनासाठी उपाययोजना फोर जी स्पेक्ट्रमची प्रक्रिया सुरू असून, एप्रिल, मे महिन्यात ही सेवा राज्यात सुरू होईल, तर देशभरात आॅक्टोबरपर्यंत सुरू होईल. बाँडविक्रीतून साडेआठ हजार कोटी मिळण्याची शक्यता आहे. भारत एअर फायबरद्वारे एक्स्चेंजपर्यंत फायबरद्वारे व तिथून पुढे ग्राहकापर्यंत वायरलेस सेवा दिली जाईल. त्यामध्ये आवाजाचा व सेवेचा दर्जा अधिक चांगला राहील. बिघाड होण्याचे प्रमाण कमी राहील. यामध्ये खासगी व्यक्तींना भागीदार म्हणून सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे.
कामावरील ताण होणार कमी
कोणत्याही कर्मचाºयावर कामाचा अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कर्मचाºयांचा वाढता ताण लक्षात घेता, तो कमी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती करण्यात येत आहे, असे मनोजकुमार मिश्रा यांनी सांगितले़