Join us

Budget 2020: 'अर्थसंकल्पातून मुंबई अन् महाराष्ट्राच्या पदरी निराशा; केंद्राचं कुचकामी बजेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 1:58 PM

त्याचसोबत ५ नवीन स्मार्ट सिटीची घोषणा केली पण जुन्या १०० स्मार्ट सिटीच काय झालं?

मुंबई - केंद्र सरकारकडून देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. मात्र या बजेटमधून सगळ्यात मोठी निराशा महाराष्ट्र आणि मुंबईची झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देशाला देतो पण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ठोस काही नाही अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हटले की, ह्या बजेटमध्ये नवीन काही नाही, नवी बाटलीत जुनी दारू इतकचं आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार आधी सांगितलेलं, पण त्यासाठी ठोस उपाययोजना नाहीत, २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर कृषी विकास दर ११ टक्के असला पाहिजे पण तो फक्त २ टक्क्याच्या आसपास आहे. त्यामुळे ही पोकळ घोषणा असून शेतकऱ्यांची फसवणूकच करणारी आहे असा आरोप त्यांनी केला. 

मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार? निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत

सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकणार, अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा

त्याचसोबत ५ नवीन स्मार्ट सिटीची घोषणा केली पण जुन्या १०० स्मार्ट सिटीच काय झालं? सर्वसामान्य नागरिकांना काय सुविधा दिल्या? ते सांगितलं नाही. अर्थव्यवस्था मोडकळीला आली आहे. अर्थसंकल्प सादर होत असताना शेअर बाजार कोसळला, हे कसलं निदर्शक आहे? रेल्वे खासगीकरण करणार, LIC ,IDBI विकत काढणार त्यामुळे केंद्राचं कुचकामी बजेट आहे अशी टीका बाळासाहेब थोरातांनी केली आहे. 

बँकेत जमा रकमेच्या सुरक्षेची हमी एक लाख रुपयांवरून पाच लाखांवर : अर्थमंत्री

तसेच फसव्या घोषणा करतात, विकासदर कमी, वित्तीय तूट वाढली, नवा रोजगार तयार होत नाही, विकास ठप्प आहे, बुलेट ट्रेन फायदा महाराष्ट्राला काय? पण वाटा राज्याचा जास्त घेत आहे त्यामुळे विरोध करणारच असा पवित्रा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे. 

मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार

एलआयसीची भागीदारी विकणारदेशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीबाबत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा करण्यात आली आहे. एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच आयडीबीआय बँकेमधील आपली भागीदारीसुद्धा सरकार विकणार आहे. 

इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले अन् कररचनाही; अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

कसा असणार टॅक्स स्लॅब5 लाख ते 7.5 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर आकारला जाईल, जो 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत घटवण्यात आला आहे. 7.5 लाख ते 10 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के आयकर भरावा लागणार, 10 लाख ते 12.5 लाख पर्यंतचे उत्पन्नावर 20% कर आकारला जाणार आहे. यापूर्वी हा कर 30 टक्के होता. 12.5 लाख ते 15 लाख उत्पन्न - 25 टक्के, 15 लाखांपेक्षा अधिक असल्यास 30% पूर्वीप्रमाणेच कर आकारला जाईल. 5 लाख इनकम असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. त्यामुळे मध्यमवर्गाला याचा जास्त फायदा होईल. 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी विशेष रेल्वे आणि विमान सेवा, अर्थसंकल्पात मोठी घोषणा 

नितीन गडकरींचे खाते सुस्साट; तब्बल 19 हजार किमींचे महामार्ग बांधणार

2025पर्यंत देशाला 'टीबी'मुक्त करणार; 20 हजार नवी हॉस्पिटल उभारणार

बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता

 शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा 

टॅग्स :बाळासाहेब थोरातबजेटमंत्रीअर्थव्यवस्थामुंबईनिर्मला सीतारामननरेंद्र मोदीबुलेट ट्रेन