Budget 2020: अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार?, अपेक्षा पूर्ण होणार की अपेक्षाभंग; मुंबईकरांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 02:33 AM2020-02-01T02:33:55+5:302020-02-01T05:15:26+5:30

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३, ३ अ रखडलेले आहेत. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे.

Budget 2020: What will the Railways get in the Budget? Curiosity among Mumbaiites | Budget 2020: अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार?, अपेक्षा पूर्ण होणार की अपेक्षाभंग; मुंबईकरांमध्ये उत्सुकता

Budget 2020: अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार?, अपेक्षा पूर्ण होणार की अपेक्षाभंग; मुंबईकरांमध्ये उत्सुकता

Next

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात मुंबईतील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तरतूद केली जावी, यासह सीएसएमटी ते पनवेल जलद मार्गिका आणि पनवेल-वसई तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी मिळावी, अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे.

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३, ३ अ रखडलेले आहेत. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल उन्नत मार्ग, गोरेगाव ते बोरीवली दरम्यान हार्बर रेल्वे मार्गाचा विस्तार, पनवेल-विरार नवीन उपनगरीय मार्ग असे रेंगाळलेले रेल्वेचे अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी अर्थसंकल्पातून पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर वातानुकूलित लोकलची संख्या वाढविणे, स्वच्छतागृहांची संख्या वाढविणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे इत्यादी अतिआवश्यक गोष्टींना प्राधान्य द्यावे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

एमयूटीपीच्या प्रकल्पांना केंद्रीय अर्थसंकल्पात १ हजार ते १ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे. तसेच एमयूटीपीच्या प्रकल्पांसाठी राज्य सरकारदेखील तेवढाच निधी देणार आहे. १२ डब्यांच्या एसी लोकल आणखी दाखल होणार आहेत, अशी माहिती एका अधिकाºयाने दिली. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर जादा एसी लोकल, कल्याण ते मुरबाड रेल्वे मार्ग, बुलेट ट्रेन, कल्याण यार्ड, १५ डब्यांची लोकल, फलाटांची लांबी, रेल्वे मार्गाची दुरुस्ती या प्रकल्पांसाठी किती निधी मिळणार आहे, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Budget 2020: What will the Railways get in the Budget? Curiosity among Mumbaiites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.