Join us

विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:09 AM

मुंबई : कोरोना महासाथीच्या आघातामुळे विस्कळीत झालेली देशाची अर्थव्यवस्था स्थिरस्थावर करण्याबरोबरच विकासाला चालना देणारा यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल ...

मुंबई : कोरोना महासाथीच्या आघातामुळे विस्कळीत झालेली देशाची अर्थव्यवस्था स्थिरस्थावर करण्याबरोबरच विकासाला चालना देणारा यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करायला हवे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांनी रमा प्रकाशनाच्या अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमात केले. अर्थसंकल्पातील विविध तरतुदींमुळे देशाचे अर्थचक्र गतिमान होईल, असा विश्वास डॉ. फडणीस यांनी व्यक्त केला. अर्थमंत्र्यांनी दूरदृष्टीने पुढील दशकाचा विचार करून अनेक संकल्प सोडले असून, त्याचा परिणाम लवकरच दिसू लागेल, असेही फडणीस यांनी सांगितले. अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर आणि कृषितज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनीही या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. सरकार पायाभूत सुविधांंसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करणार असल्याने रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यांनी या ऑनलाईन चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.