मुंबई विद्यापीठाचा ५७२.६० कोटींचा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:10 AM2018-04-01T01:10:10+5:302018-04-01T01:10:10+5:30
विकासकामांना प्राधान्यक्रम देत मुंबई विद्यापीठाचा सर्वसमावेशक २०१८-१९ सालचा ५७२.६० कोटींचा अर्थसंकल्प शनिवारच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अधिसभेत या वर्षीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
मुंबई : विकासकामांना प्राधान्यक्रम देत मुंबई विद्यापीठाचा सर्वसमावेशक २०१८-१९ सालचा ५७२.६० कोटींचा अर्थसंकल्प शनिवारच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अधिसभेत या वर्षीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये ५१.१० कोटींची तूट दाखविण्यात आली आहे. तीन स्वतंत्र भागांमध्ये या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, यामध्ये देखभाल आणि विकास, स्वतंत्र प्रकल्प आणि सहयोगी उपक्रमासाठी अनुदान अशा बाबींचा समावेश आहे.
विद्यार्थी भवन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत, परिसर विकास, विद्यापीठ सुरक्षा सक्षमीकरण, कॉम्प्लेक्स संग्रहालय इमारत, १०० क्षमतेचे अतिथीगृह, ५०० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह, शिक्षकांसाठी संशोधन प्रोत्साहन अनुदान, केंद्रीय संशोधन सुविधा (इमारत आणि पायाभूत सुविधा) वाचनालयाचे अद्ययावतीकरण, अभिलेख हस्तलिखितांचे अद्ययावतीकरण, डेटा सेंटरचे अद्ययावतीकरण, शैक्षणिक पायाभूत सुविधा, आयसीटी पायाभूत सुविधा, कॅम्पसमध्ये कन्व्हेंशन सेंटर, शिक्षक आणि विद्यार्थी यांना सर्वोत्तम संशोधन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शैक्षणिक विभाग पुरस्कार, प्लेसमेंट सेल, कौशल्य व उद्योजगता विकास केंद्र आणि रिसर्च पब्लिकेशन ग्रँट्स टू सायन्स आणि इतर विभाग अशा बाबींवर आधारित विशेष अर्थसंकल्पीय तरतुदींसह विद्यापीठ सुधारणांवर भर देत विद्यार्थी केंद्रित अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
दरम्यान, आर्थिक वर्ष २०१७-१८साठी विद्यापीठाला एकूण १५ लाखांची देणगी प्राप्त झाली आहे. २०१८-२०१९ या वर्षामध्ये नियोजित बांधकामांना विशेष प्राधान्यक्रम देण्यात आले असून यामध्ये विद्यार्थी भवन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत, कॉम्प्लेक्स संग्रहालय इमारत १०० क्षमतेचे अतिथीगृह आणि ५०० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह अशा नियोजित बांधकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
२०१८-२०१९ नवीन उपक्रम/योजना
- शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत- २ कोटी
- परिसर विकास- १५ कोटी
- विद्यापीठ सुरक्षा सक्षमीकरण- ७५ लाख
- कॉम्प्लेक्स संग्रहालय इमारत- ३ कोटी १५ लाख
- १०० क्षमतेचे अतिथीगृह-
३ कोटी
- ५०० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह- ३ कोटी
- शिक्षकांसाठी संशोधन प्रोत्साहन अनुदान-
२० लाख
- केंद्रीय संशोधन सुविधा
(इमारत आणि पायाभूत सुविधा)- १ कोटी
- वाचनालयाचे अद्ययावतीकरण- १ कोटी
- अभिलेख हस्तलिखितांचे अद्ययावतीकरण-
७५ लाख
- डेटा सेंटर अद्ययावतीकरण- ७५ लाख
- शैक्षणिक पायाभूत सुविधा- १ कोटी ५० लाख
- आयसीटी पायाभूत सुविधा- १ कोटी ५० लाख
- कॅम्पसमध्ये कन्व्हेंशन सेंटर- २ कोटी
- शिक्षक आणि विद्यार्थी यांना सर्वोत्तम संशोधन पुरस्कार- ५ लाख
- सर्वोत्कृष्ट शैक्षणिक विभाग पुरस्कार- ५ लाख
- लेसमेंट सेल- १० लाख
- कौशल्य व उद्योजगता विकास केंद्र- १ कोटी
- रिसर्च पब्लिकेशन ग्रँट्स टू सायन्स आणि इतर विभाग- १० लाख
- विद्यार्थी भवन- २ कोटी