Join us

अहमदनगर महापालिकेचे बजेट १२०० कोटींच्या पार, स्थायी समितीला सादर

By अरुण वाघमोडे | Published: March 13, 2023 5:00 PM

सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मनपात स्थायी समितीची सभा झाली.

अहमदनगर - महापालिकेचे २०२३-२४ चे तब्बल १२४० कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक प्रशासनाच्यावतीने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्थायी समितीला सादर केले. या अंदाजपत्रकावर सदस्य एक दिवस अभ्यास करून बुधवारी (दि.१५) होणाऱ्या सभेत चर्चा करणार असल्याचे समितीचे सभापती गणेश कवडे यांनी सांगितले.

सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मनपात स्थायी समितीची सभा झाली. यावेळी समिती सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते. अयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात महुसली उत्पन्न ४३२ कोटी २१ लाख, भांडवली जमा ७४० कोटी ५ लाख अंदाजित आहेत. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी ८० कोटी, ८० लाख, संकलीत करावर अधारित करापोटी ७९ कोटी ७० लाख, जीएसटी अनुदान १२० कोटी ६० लाख, इतर महुसली अनुदान १७ कोअी ८५ लाख, गाळा भाडे ३ कोटी ६० लाख, पाणीपट्टी ४२ कोटी ६१ लाख, मिटद्वारे पाणीपुरवठा २० कोटी, संकिर्णे ४२ कोटी कोटी ३९ लाख तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरून ८१८ कोटी ३७ लाख रुपये जमा होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त मनपाकडे येणारी अनामत रक्कम, शिक्षण कर, नवीन नळ कनेक्शन तसेच पाणीपुरवठा, भुयारी गटार व रस्त्यांसाठी स्व हिस्सा भरण्यासाठी महापालिका घेणारे कर्जही या अदांजपत्रकात गृहितधरून १२४० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे.

 

टॅग्स :अहमदनगर