बजेट प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:35 AM2021-02-05T04:35:03+5:302021-02-05T04:35:03+5:30

(मंत्री - वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा पालकमंत्री मुंबई शहर) बजेट प्रतिक्रिया अस्लम शेख (मंत्री - वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा ...

Budget response | बजेट प्रतिक्रिया

बजेट प्रतिक्रिया

Next

(मंत्री - वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा पालकमंत्री मुंबई शहर)

बजेट प्रतिक्रिया

अस्लम शेख

(मंत्री - वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा पालकमंत्री मुंबई शहर)

विविध करांच्या माध्यमातून महाराष्ट्र लाखो, करोडो रुपयांची केंद्रावर उधळण करतो; पण त्या बदल्यात या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पदरी फक्त निराशाच पडली आहे. ‘कोरोना’ महामारीतून आता कुठे देश सावरत असताना सर्वसामान्यांसाठी काही दिलासादायक निर्णयांची अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून केली जात होती; पण दिलासा देण्याऐवजी देशाची संपत्ती खासगी कंपन्यांना विकण्याचा घाट सरकारने घातला आहे. वर्षानुवर्षे सर्वसामान्यांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम असलेली एलआयसी विकण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्या राज्यांतील जनतेला खूश करण्यासाठी हजारो कोटींच्या तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्याने अर्थसंकल्पाला निवडणूक जाहीरनाम्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

--------------------------------------------

Web Title: Budget response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.