Join us

चर्चगेट स्थानकातील बफर धोकादायक

By admin | Published: July 25, 2015 1:39 AM

चर्चगेट स्थानकात लोकल बफरला आदळून झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार सदस्यीय समितीकडून नुकताच

मुंबई : चर्चगेट स्थानकात लोकल बफरला आदळून झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार सदस्यीय समितीकडून नुकताच अहवाल सादर करण्यात आला असून या अहवालात स्थानकातील बफर बदलण्याची सूचना करण्यात आली आहे. मुळात लोकलचा बफर आणि प्लॅटफॉर्मवरील बफर हे समोरासमोर आणि एकाच रेषेत नसल्याने अपघाताचे स्वरूप मोठे झाले, अशी चर्चा रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये होऊ लागली. चर्चगेट स्थानकातील रूळ हे वर करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकलचा बफर आणि प्लॅटफॉर्मवरील बफर एकाच रेषेत आले नसल्याने अपघात मोठा झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे चर्चगेट स्थानकातील बफर हे सुमारे ८0 वर्षांपेक्षा जास्त जुने असून त्यांची मुदत संपली आहे. या संदर्भातील अहवालात समितीकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सूचनाही करण्यात आल्या आहेत. बारा डबा, पंधरा डबा आणि २४ डबा क्षमता झेलण्याची क्षमता बफरमध्ये असली पाहिज. तसेच त्यांच्या देखभालीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. चर्चगेट स्थानकात प्रवेश करताना ताशी ४५ किमीची वेगमर्यादा आखून देण्यात आल्याचा दावा रेल्वे अधिकारी करतात. मात्र तशी कोणतीच वेगमर्यादा नसल्याचेही सांगण्यात आल्याने रेल्वे अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यातून दिसून आला .