राष्ट्र उभारणीसाठी युवकांनी शिक्षणाचे हत्यार हाती घ्यावे

By Admin | Published: January 13, 2015 01:11 AM2015-01-13T01:11:32+5:302015-01-13T01:11:32+5:30

युवक हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. राष्ट्रउभारणीसाठी युवकांची मोठी मदत लागणार असून युवकांनी शिक्षणाचं हत्यार हाती घेऊन एका संपन्न आणि समृध्द राष्ट्राची उभारणी करावी

To build nation, youth should take up the school of education | राष्ट्र उभारणीसाठी युवकांनी शिक्षणाचे हत्यार हाती घ्यावे

राष्ट्र उभारणीसाठी युवकांनी शिक्षणाचे हत्यार हाती घ्यावे

googlenewsNext

मुंबई : युवक हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. राष्ट्रउभारणीसाठी युवकांची मोठी मदत लागणार असून युवकांनी शिक्षणाचं हत्यार हाती घेऊन एका संपन्न आणि समृध्द राष्ट्राची उभारणी करावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळुकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सोमवारी विवेकानंद जयंती प्रित्यर्थ आयोजित युवा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठातील १०० महाविद्यालयातील अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. युवा नेतृत्वाचे सक्षमीकरण या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारीत होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.राजन वेळूकर हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.नरेश चंद्र यांनी केले. यावेळी सुप्रसिध्द सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांने विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच पार्श्वगायक नंदेश उमप, अभिनेत्री उर्मिला कानेटकर, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, मुक्ता दाभोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

Web Title: To build nation, youth should take up the school of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.